वाकुर्डे योजनेचे पाणी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार लवकरच अंत्री बु|| तलावात येणार  : माजी मंत्री शिवाजीराव नाईक .


वार्ताहर/शिराळा



अंत्री बु|| येथील तलावाच्या मुख्य विमोचकचे काम सत्वर पूर्ण करून वाकुर्डे उपसा जलसिंचन योजनेचे पाणी या तलावात सोडणेकामी संबधित सांगली व वारणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांचेसोबत सकारात्मक चर्चा झाली असून वाकुर्डे योजनेचे पाणी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार लवकरच अंत्री बु|| तलावात येणार असल्याची माहिती माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी दिली.


           याबाबत माहिती देताना माजी मंत्री शिवाजीराव नाईक म्हणाले, सध्या कोरोना आजाराच्या भीतीने व लॉकडाऊनमुळे पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम विभागाची अनेक कामे मजुरांअभावी खोळंबली आहेत. सध्या उन्हाळ्याची तीव्रता अधिक जाणवू लागल्याने बऱ्याच तलावातील पाणी पातळी घटली आहे. तालुक्यातील मोरणा मध्यम प्रकल्पातील घटलेली पाणी पातळी लक्षात घेता वारणा पाटबंधारे विभागामार्फत वाकुर्डे उपसा जलसिंचन योजनेचे खिरवडे आणि हात्तेगाव येथील विद्युत पंप सुरू करून वाकुर्डेचे योजनेचे पाणी करमजाई तलावात सोडण्यात आले आहे. तेथून पुढे हे पाणी  मोरणा नदिद्वारे शिराळा येथील मोरणा मध्यम प्रकल्प तलावात सोडून वारणा पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.