सातारा शहरातील ठराविक बँकांच्या मुख्य कार्यालयांना अटी व शर्तीवर प्रशासकीय कामासाठी परवानगी.


सातारा शहरातील ठराविक बँकांच्या मुख्य कार्यालयांना अटी व शर्तीवर प्रशासकीय कामासाठी परवानगी




सातारा दि. 30 (जि.मा.का): सातारा तालुक्यात जास्त प्रमाणात कोरोना विषाणूंचा संसर्ग झालेले रुग्ण आढळत असल्याने सातारा नगरपालिका क्षेत्र व त्रिशंकू क्षेत्र याचबरोबर खेड, विलासपूर, गोडोली, शाहुपूरी, म्हसवे, सैदापूर, वाढे, कोडोली, संभाजीनगर, समर्थनगर, धनगरवाडी या ग्रामपंचायतींच्या संपूर्ण क्षेत्रामध्ये क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 अन्वये पुढील आदेश होईपर्यंत मनाई आदेश पारीत करण्यात आलेला आहे.  

सातारा शहरातील मुख्य कार्यालये असलेल्या बँकांची कार्यालये चालु ठेवणे आवश्यक असल्याने जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह, यांनी क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 मध्ये अत्यावश्यक सेवेखाली पुढील बँकांच्या फक्त मुख्य कार्यालयांना केवळ प्रशासकीय कामासाठी चालु ठेवण्यासाठी अटी व शर्ती घालून सुट दिली आहे. या बँकांची नावे व पत्ते पुढील प्रमाणे..

1. बैंक ऑफ महाराष्ट्र झोनल ऑफिस, एलआयसी बिल्डीग, जिल्हाधिकारी कार्यालय सातारा

2. बैंक ऑफ महाराष्ट्र सातारा, एटीएम कॅश सप्लाय सेंटर, राजपथ, भवानी पेठ, सातारा

3.  स्टेट बैंक ऑफ इंडीया, रिजनल ऑफिस, एलआयसी बिल्डींग, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सातारा

4. स्टेट बँक ऑफ इंडीया, एटीएम कॅश सप्लाय सेंटर, प्रतापगंज पेठ, सातारा

5. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक, मुख्य कार्यालय, जिल्हा परिषदेसमोर सातारा 

6. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक, डाटा सेंटर व एटीएम कॅश सप्लाय सेंटर 

7. बँक ऑफ इंडिया एटीएम कॅश सप्लाय सेंटर, सातारा-कोरेगांव रोड, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सातारा

8. बैंक ऑफ बडोदा, एटीएम कॅश सप्लाय सेंटर, सातारा-कोरेगांव रोड, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सातारा 

9. आयडीबीआय बँक, रिजीनल ऑफीस व एटीएम कॅश सप्लाय सेंटर, पोवई नाका, सातारा

10. जनता सहकारी बैंक लि. सातारा 

11. प्राथमिक शिक्षक सहकारी बैंक लि. सातारा 

12. कर्नल आर.डी. निकम सैनिक सहकारी बँक लि. सातारा 

13. दि रयत सेवक को-ऑप बँक लि. सातारा

14. सातारा जिल्हा मध्यवती सहकारी बँक  लि. सातारा

वरील बँकाना पुढील अटी व शर्ती लागू असतील  

 या बँकाना कामकाजासाठी सकाळी 11 ते दु. 2 वाजेपर्यंत  परवानगी असेल. वरील 1 ते 9 बँकांना बँक चेक क्लीअरन्सचे काम व एटीएम सप्लाय सेंटरचे काम व  प्रशासकीय कामकाज करण्यासाठी परवानगी असेल.  तसेच अ.क्र.10 ते 14 या बँकांना फक्त प्रशासकीय काम करण्याकरीता बॅंकेतल्या बँकेत काम करण्यासाठी परवानगी देणेत येत आहे.  बँक मुख्यालयाला कमीत कमी कर्मचारी वर्गात काम करावे लागेल. तसेच लोकांच्या भेटीसाठी व लोकांच्या बँक मुख्यालयातील प्रवेशास परवानगी नाही.  तसेच अत्यावश्यक असणारे कर्मचारी वर्ग यांचे ओळखपत्र इन्सीटंड कमांडर तथा उपविभागीय दंडाधिकारी सातारा यांचेकडून घ्यावे.  सॅनिटायझरचा वापर, नाक व तोंडास मास्क लावणे, सोशल डिस्टन्स पाळणे इत्यादींचे पालन करणे बंधनकारक राहील. शासन निर्णय डीएमयु/2020/सीआर.92/डीआयएसएम-1 दि. 17/04/2020 मधील दिलेल्या आदेशानुसार कोरोनाबाबत दिलेल्या सुधारीत मार्गदर्शक सुचना व त्यासोबत जोडलेले परिशिष्ट 1 व 2 चे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील. या आदेशाचे पालन न करणाऱ्या विरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 ते 60, भारतीय दंड विधान कलम 188 व इतर कायद्यातील लागू असलेल्या तरतूदीनुसार गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही पोलीस प्रशासनाने करावी.