तळबीडमधील वृद्धाला डॉ. सोलंकींच्या रुपाने भेटला देव!


तळबीडमधील वृद्धाला डॉ. सोलंकींच्या रुपाने भेटला देव! 


कराड : 


झाले असे कि उंब्रज येथील मेडिकल कॅम्प(वय 50 वर्ष वरील पोलीस बांधवांचे आरोग्य तपासणी)संपवून  डॉ. सोळंकी आणि मुकुंद सोहनी परत कराडला यायला निघाले. उंब्रजच्या वेशीवर पोहोचतो तोवर त्यांच्या समोर एक वृद्ध गृहस्थ रस्त्यावर आडवे पडले होते. वेदनांनी कळवळत होते.
डॉ. सोळंकी लगेच गाडीतुन खाली उतरले आणि त्या ग्रहस्थांची चौकशी करू लागले. त्यांना व्यवस्थित तपासले. बिचाऱ्यांचे खुब्याचे हाड मोडले होते. लगेच अँबुलन्सला फोन लावला आणि उंब्रजला त्वरित येण्याचे निर्देश दिले. आधी त्या गृहस्थाला उचलून रस्त्याच्या बाजूला आडोशाला घेतले. पेशंटच्या वेदना कमी होण्यासाठी स्वतःकडची औषधे त्याला दिली. तोवर त्या पेशंटचा मुलगा तिथे पोहोचला. त्याला सगळी परिस्थिती डॉक्टरांनी समजावली, काय नेमके करायचे ह्याचे मार्गदर्शन दिले आणि स्वतःचा नंबर देखील दिला. कोणतीही अडचण असल्यास मला फोन कर हे बजावून सांगितले. सध्या जेव्हा करोनाच्या भीतीपोटी लोक एकमेकांशी बोलणे देखील टाळतायत तिथे डॉक्टरांनी त्या माणसाला नुसते तपासले नाही तर त्याला इतका आधार दिला कि जणू ते डॉक्टरांचेच वडील आहेत.
माणुसकीचा ह्यापेक्षा मोठा संदेश आणखी काय असू शकतो .
अशी ही कराडकरांची माणुसकी !!