मुंबई : राज्यात असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी एक मागणी केली होती. एखाद्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती तत्काळ मिळावी यासाठी रॅपिड टेस्टची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी ठाकरे यांनी केली होती. केंद्रानेही त्यांच्या मागणीची दखल घेत परवानगी दिली आहे.
आता लवकरच महाराष्ट्रात रॅपिड टेस्टिंग शक्य होणार आहे. रॅपिड टेस्टसाठी केंद्र सरकारने अखेरीस परवानगी दिल्याने मुंबई महापालिका दक्षिण कोरियामधून एक लाख किट्स विकत घेणार आहे. ते किट्स आले की रॅपिड टेस्टिंगला मुंबईत सुरुवात होईल. रॅपिड टेस्टमुळे एखाद्याला इन्फेक्शन झालं आहे का, याची माहिती तत्काळ मिळते. इन्फेक्शन झालं असल्यास त्या व्यक्तीची कोरोना टेस्ट केली जाऊ शकते .