आमदार म्हणून महापुरात तर मंत्री म्हणून कोरोना संकटात त्यांच्या प्रगल्भतेचे दर्शन.
पाटण/प्रतिनिधी
संकटकाळात जनतेला कणखर आणि प्रगल्भ नेतृत्वच उपयोगी पडते संकटसमयी वेळप्रसंगी आपला जीव धोक्यात घालून सद्यपरिस्थितीवर मात करण्यासाठी असे नेतृत्व मागेपुढे पहात नाहीत. त्यांचे नियोजनबध्द उपक्रम, जागेवर धाडसी निर्णय घेवून संकटावर मात करण्याकरीता ठोस कृती करणाऱ्या नेत्यांच्या कार्याचे,प्रगल्भतेचे दर्शन याकाळात जनतेला घडते.असेच कणखर आणि प्रगल्भ व कार्यतत्पर असणारे नेतृत्व राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या रुपाने पाटण विधानसभा
मतदारसंघाला लाभले असून कोरोना विषाणूचे सर्वात मोठे संकट सर्वत्र आले असताना या संकटात आपला जीव धोक्यात घालून आपल्या मतदारसंघातील जनतेची तसेच राज्यातील जनतेची काळजी घेणेकरीता गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई हे स्वत: २४ बाय ७ अलर्ट राहून संकटाशी सामना करीत आहेत.आमदार असताना गतवर्षी मोठया प्रमाणात आलेल्या महापुरात तर आता मंत्री असताना कोरोना संकटाच्या प्रसंगी न डगमगता सुरु असलेल्या त्यांच्या जनहितार्थ कार्याचे व प्रगल्भतेचे दर्शन पाटण मतदारसंघासह महाराष्ट्र राज्यातील जनतेला होत आहे.
कोरोना विषाणूने गत महिनाभरापेक्षा जास्त सर्वत्र मोठया प्रमाणात हाहाकार माजविला आहे. कोरोना विषाणूच्या सर्वात मोठया आरिष्ठाचा सामना करण्याकरीता देशभरात सर्वत्र सर्वोत्तोपरी प्रयत्न सुरु असल्याचे दिसून येत आहे.हे संकट आपल्यापर्यंत आपल्या मतदारसंघातील जनतेपर्यंत येवू नये याकरीता राज्यातील सर्वच विभागातील लोकप्रतिनिधींनी आपली कंबर कसली असून या संकटाचा सामना करण्याकरीता प्रत्येक लोकप्रतिनिधींचे अहोरात्र प्रयत्न सुरु आहेत.पाटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे गृहराज्य मंत्री ना.शंभूराज देसाई हे तर कोरोनाच्या पार्श्वभूमिवर २४ बाय ७ सतर्क असून कोरोनाच्या सद्यपरिस्थितीवर मात करण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असल्याचे दिसत आहेत.