नरेंद्र मोदींच्या आवाहनाला ताकतीने प्रतिसाद द्या : खासदार उदयनराजे भोसले.


सातारा : कोरोना विरूध्दच्या लढ्यात संपूर्ण देशाने एकजूट दाखविली आहे. आता सातारा जिल्ह्यातील नागरीकांनीही आज रात्री नऊ वाजता नऊ मिनिटांसाठी आपल्या घरी दिवा लावून मोठ्या उत्साहाने व ताकतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला ताकतीने प्रतिसाद द्या, असे आवाहन साताऱ्याचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला आहे.


          खासदार उदयनराजेंनी आपल्या व्टिटर अकौंटवरून याबाबतचे आवाहन जनतेला केले आहे. यामध्ये त्यांनी म्हटले की, कोरोना विरोधातील लढाईत सर्वांची एकजूट महत्वाची आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारत सरकारने आजपर्यंत केलेया प्रत्येक आवाहनाला सर्वांनी मोठ्या उत्साहाने प्रतिसाद दिला आहे. देशातील तमाम जनतेने कोरोनाविरुद्धच्या लढ्यात संपूर्ण जगाला जी एकजूट दाखवून दिली आहे. हे खूप कौतुकास्पद व अभिमानास्पद आहे. ही एकजूट अशीच कायम राहिल्यास आपण कोरोनावर लवकरच मात करू. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारत सरकार यांनी आजपर्यंत केलेल्या प्रत्येक आवाहनाला आपण सर्वांनी मोठ्या उत्साहाने व ताकदीने प्रतिसाद दिला आहे. त्याच प्रमाणे आज प्रत्येकाने रात्री नऊ वाजता नऊ मिनिटांसाठी आपल्या घरी दिवा लावायचा आहे. तो दिवा असेल देशाच्या एकात्मतेचा, लढणाऱ्या डॉक्‍टर व पोलिस बांधवांच्या स्फूर्तीचा व तमाम देशवासीयांच्या धैर्याचा, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे .