तुम्हाला सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे दिसत असतील तर ती लपवू नका : मुख्यमंत्री


मुंबई : देशासह राज्यात देखील कोरोना बाधितांचा आकडा सतत वाढत आहे. ‘जर तुम्हाला सर्दी, खोकला, ताप अशी लक्षण दिसत असले तर ती लपवू नका. फिव्हर क्लिनीकमध्ये जा’, असा सल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना दिला आहे.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, ‘पीपीई किटचा थोडासा तुटवडा आहे. मी खोटं बोलणार नाही. केंद्र आणि राज्य सरकार पीपीई किट देत आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले .


पुढे ते म्हणाले, ‘केंद्र मोफत धान्य देत आहे. मात्र आतापर्यंत त्यांनी फक्त तांदूळ दिले. त्यामुळे आम्ही गहू आणि डाळीचीही मागणी केली आहे. डाळी आणि गहू आल्यानंतर ताबडतोब पुरवठा सुरु करु, असा शब्द ठाकरे यांनी दिला आहे.


दरम्यान, आतापर्यंत महाराष्ट्रात ६६७९६ टेस्ट झाल्या. यात ९५ टक्के लोक हे निगेटिव्ह आल्या आहेत. या टेस्टनंतर ३६०० लोक पॉझिटिव्ह आले आहेत. काही लोकांना बरं करुन घरी सोडलं आहे. जेवढे पॉझिटिव्ह लोक सापडतात ते लोक अति सौम्य किंवा ज्यांना लक्षण नाही अशी लोक आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे .


Popular posts
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुंभारगाव येथील त्रिपुरी पौर्णिमेची यात्रा रद्द.
Image
साताऱ्यात २३ नोव्हेंबर पासून शाळा सुरू; जिल्हाधिकाऱ्यांचे शाळा व्यवस्थापनाला आदेश.
Image
कोरोना संसर्गाची दुसरी लाट थोपविण्यासाठी ; नागरिकांनी सूचनाचे पालन करावे, अन्यथा कारवाई करणार - जिल्हाधिकारी शेखर सिंह
Image
पाटण तालुका पत्रकार संघामार्फत ढेबेवाडी विभागातील कोरोना योध्यांचा सन्मान.
Image
ना.शंभूराज देसाईंमुळे पाटण ग्रामीण रुग्णालय झाले उपजिल्हा रुग्णालय;100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय स्थापन करण्यास शासनाची मान्यता.
Image