उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार देशाला संबोधित.


नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या (14 एप्रिल, मंगळवार) देशाला सकाळी दहा वाजता संबोधित कऱणार आहेत. कोरोनासाठीचा लाॅक डाऊन कालावधी हा 15 एप्रिल रोजी संपत आहे. त्या आधीच मोदी हे देशाला आता नवीन काय धोरणे सरकार आखणार, याविषयी बोलणार आहेत.


मोदी हे देशाला मार्गदर्शन कऱणार असल्याची चर्चा गेले दोन-तीन दिवस होती. मात्र त्याचा इन्कार करण्यात आला होता. आज पंतप्रधान कार्यालयाने दुपारी दोन वाजून दहा मिनिटांनी ही घोषणा केली. केंद्राने लागू केलेला 21 दिवसांचा लाॅक डाऊनचा कालावधी कसा शिथिल करावा, यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बोलत आहेत. अनेक मुख्यमंत्र्यांनी लाॅकडाऊन कालावधी वाढविण्याकडे कल दाखविला. त्यानुसार महाराष्ट्र, पंजाब, ओरिसा या राज्यांनी तसे निर्णय जाहीर देखील केले. मात्र या लाॅक डाऊनमुळे आता गरिबांचे हाल होऊ लागल्याने त्यावर मार्ग काढणे गरजेचे झाले आहे.


मोदींनी कोरोनासाठी आतापर्यंत तीन वेळा देशाला मार्गदर्शन केले. ती वेळ रात्री आठची होती. आता पहिल्यांदाच सकाळी दहा वाजता ते बोलणार आहेत. मोदी उद्या देशाला काय संबोधित करणार आहेत याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे.


Popular posts
गुढे वि. का स. सेवा सोसायटी निवडणुकीत शिवसेनेचा 13 - 0 ने मोठा विजय. राष्ट्रवादीच्या पॅनेलचा दारुण पराभव. 20 वर्षांनंतर सत्तातर .
इमेज
बनपुरी सोसायटीत शिवसेना पुरस्कृत स्व. रघुनाथ महादेव पाटील शेतकरी विकास पॅनेलचा 13-0 ने दणदणीत विजय
इमेज
काळगाव सोसायटीत विजय तरुणाईचा..
इमेज
सारंग पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त शाळेतील मुलांना संजीवन प्रतिष्ठान व नवभारत पतसंस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकी ,
इमेज
काळगांव येथील वि.का. स.सेवा सोसायटीत यशवंतराव चव्हाण शेतकरी सोसायटी बचाव पॅनेलचा दणदणीत विजय. 13-- 0 ने मोठा विजय प्राप्त.तर शिवशंभू ग्रामविकास पॅनेलचा दारुण पराभव.
इमेज