पालकमंत्री असावा तर असा....... वाशिम जिल्हावासियांची प्रतिक्रिया


गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई रिसोडच्या धोटे कुटुबियांकरीता देवदूतासारखे धावून आले. पुणे येथे अडकलेल्या या कुटुंबाला मदत करुन ना.देसाईंनी जपले पालकत्व.


कराड दि.१८ : वाशिम जिल्हयातील दैनिक भास्कर वृत्तपत्राचे वार्ताहर दत्ता इंगळेनी वाशिमचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाईंना पहाटे पहाटे एक व्हाटसॲप मेसेज केला वाशिम जिल्ह्यातील कारंजा - रिसोड येथील व्यवसाय सुरु करायला गेलेले पती-पत्नी व त्यांचे ०५ सदस्यांचे कुटुंब लॉकडाऊनमुळे पुणे येथे अडकून पडले आहे पुण्यामध्ये कोणीही त्या कुटुंबाच्या ओळखीचे नाही या ०७ जीवांच्या अन्न खाण्यापिण्याची व्यवस्था झाली तर बरे होईल.सकाळी हा मेसेज वाचताच गृहराज्यमंत्री,वाशिमचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाईंनी यांनी तात्काळ फोन केला आणि दुपारपर्यंत शासकीय यंत्रणेमार्फत या ०७ लोकांना १५ दिवस पुरेल एवढे धान्य देवून त्यांच्या अन्न खाण्यापिण्याची व्यवस्था करीत वाशिम जिल्हयाचे पालकत्व जपले.संकटकाळात आमच्या धोटे कुटुंबाकरीता देवदूतासारखे गृहराज्यमंत्री धावून आले त्यांचे आभार मानावे इतके कमीच असल्याची प्रतिक्रिया वाशिमच्या कारंजा -रिसोड येथील विजय धोटे व कुटुंबानी व्यक्त केली आहे.


              गृहराज्यमंत्री,वाशिमचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाईंनी आज दि.१८ रोजी सकाळी व्हाटसॲप उघडल्या नंतर वाशिम जिल्हा दैनिक भास्कर वृत्तपत्राचे वार्ताहर म्हणून काम करणारे दत्ता इंगळे या व्यक्तीचा व्हाटसॲप मेसेज पाहिला त्यात लिहले होते,वाशिम जिल्ह्यातील कारंजा-रिसोड येथील धोटे नावाचे पती-पत्नी कुटुंब पुण्यात धायरी फाटा रोडवर हॉटेलवर कामानिमित्ताने गेलेले कुटुंब आहे काही दिवस कुंटूबप्रमुख विजय धोटे यांनी हॉटेलवर काम केले नंतर त्यांना कामावरुन बंद करण्यात आले आणि स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यास सुरुवात करताच राज्यामध्ये लॉकडाऊन झाले.त्यांची पत्नी पदमा धोटे या धुनी भांडी,स्वयंपाक करुन देण्याचे काम करत होत्या पंरतू हे दोन्ही व्यवसाय बंद झाले त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असून त्यांना त्यांच्या मुळ गांवी येणेही या लॉकडाऊनमुळे अशकय झाले आहे. त्यांच्या सोबत त्यांच्या तीन मुली,एक मुलगा व सासुबाई  असे पाच सदस्य आहेत पुण्यामध्ये त्या परिवाराचे कोणीही ओळखीचे नाही,त्यांचेकडे रेशनकार्ड नाही त्यांना आपल्या मदतीची अपेक्षा आहे अन्न हे परब्रह्म म्हणून आपणास पुण्याई सुद्धा लाभेल.


              हा व्हाटसॲप मेसेज वाचताच ना.शंभूराज देसाईंनी त्यांचे पुणे येथे असणारे विशेष कार्यासन अधिकारी प्रल्हाद हिरामणी यांना फोन केला आणि मला असा असा एक मेसेज वाशिमवरुन आला आहे ०७ लोकांचे धोटे कुटुंब अडचणीत आहे या ०७ व्यक्तींना १५ दिवस पुरेल एवढे धान्य देण्याची व्यवस्था आपल्याला तात्काळ करायची आहे. तुम्ही स्वत: यासंदर्भात लक्ष दया अशा सुचना दिल्या तसेच त्या कुटुबांला आणखीन काही गरज भासल्यास मला सांगा तीही मदत आपण करु. गृहराज्यमंत्र्यांचा निरोप येताच तात्काळ विशेष कार्यासन अधिकारी हिरामणी कामाला लागले आणि ना.देसाईंनी दिलेल्या मोबाईल क्रंमाकावर त्यांनी धोटे परिवाराशी संपर्क साधला व या परिसरातील खडकवासचे मंडलाधिकारी,तलाठी यांना सुचना करीत या कुटुंबाला जीवनावश्यक वस्तू तात्काळ पोहोच करणेबाबत सांगितल्यानंतर खडकवासचे मंडलाधिकारी,तलाठी यांनी दुपारपर्यंत जीवनावश्यक वस्तूंचे एक कीटच धोटे परिवाराला जागेवर नेवून दिले.गृहराज्यमंत्री यांना आपल्या गावाकडून मेसेज आला होता त्यांनी या मेसेजची तात्काळ दखल घेत आम्हाला तुम्हास हे जीवनावश्यक वस्तू देणेस पाठविले असल्याचे या दोन्ही शासकीय कर्मचाऱ्यांनी सांगितले यावेळी विजय धोटे व त्यांच्या कुटुंबाने संकटकाळात आमचे पालकमंत्री आमच्यासाठी देवदूतासारखे धावून आले ते खरोखरच आमचे पालक आहेत त्यांचे आभार मानावे इतके कमीच आहेत त्यांना आमचे धन्यवाद कळवा आपलेही आम्ही धन्यवाद व्यक्त करतो अशी प्रतिक्रिया यावेळी दिली.


              एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून नेहमीच गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या कामाचे कौतुक केले जाते वरीलप्रमाणे एका मेसेजवर अडचणीत सापडलेल्या ०७ जीवांना त्यांनी केलेली मदत ही त्याचेच उदाहरण असून समाजकारणात वावरताना घेतलेली जबाबदारी आणि मिळालेले पालकत्व कसे जपावे हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे असल्याचे त्यांच्या प्रत्येक कार्यातून पहावयास मिळत आहे.