कराड येथे शासनाच्या शिवभोजन थाळीचा शुभारंभ .


कराड : प्रतिनिधी 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील राज्यात शिव भोजन थाळी विक्रीचा शुभारंभ होत आहे.शुक्रवारी कराड शहरातही दोन ठिकाणी याचा करण्यात आला. येथील प्रशासकीय इमारती जवळील हॉटेल श्रीहरी प्रसाद व शहर पोलीस स्टेशनच्या पाठीमागील दौलत भोजनालय याठिकाणी या शिवभोजन थाळीचे वाटप सुरू करण्यात आले आहे. प्रांत अधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे व मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी गरजू लोकांना शिव भोजन थाळी देऊन याचे उद्घाटन केले.
राज्यात सत्ता आल्यास गोरगरिबांना अत्यंत कमी मोबदल्यात शिव भोजन थाळी देण्याची व्यवस्था केली जाईल असे शिवसेनेच्या जाहीरनाम्यात सांगण्यात आले होते. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले.त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बहूचर्चित या योजनेस काही दिवसापूर्वी सुरुवातही झाली.
मुंबई, पुणे पाठोपाठ आता ही थाळी कराडमध्ये देखील उपलब्ध झाली आहे. शहरात आज शुक्रवारपासून दोन ठिकाणी शिव भोजन थाळी विक्री सुरू झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना अत्यंत कमी किमतीत म्हणजेच फक्त पाच रुपयांमध्ये या जेवणाचा लाभ घेता येणार आहे. जास्तीत जास्त गरजूंनी या शिव भोजन थाळीचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रांत अधिकारी उत्तम दिघे यांनी केले आहे . 


Popular posts
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुंभारगाव येथील त्रिपुरी पौर्णिमेची यात्रा रद्द.
Image
साताऱ्यात २३ नोव्हेंबर पासून शाळा सुरू; जिल्हाधिकाऱ्यांचे शाळा व्यवस्थापनाला आदेश.
Image
कोरोना संसर्गाची दुसरी लाट थोपविण्यासाठी ; नागरिकांनी सूचनाचे पालन करावे, अन्यथा कारवाई करणार - जिल्हाधिकारी शेखर सिंह
Image
पाटण तालुका पत्रकार संघामार्फत ढेबेवाडी विभागातील कोरोना योध्यांचा सन्मान.
Image
ना.शंभूराज देसाईंमुळे पाटण ग्रामीण रुग्णालय झाले उपजिल्हा रुग्णालय;100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय स्थापन करण्यास शासनाची मान्यता.
Image