माजी नगरसेवक हरिभाऊ जोशी यांचेकडून पोलीस दादांना जेवणाचे पार्सल .


▪️पोलीस दादांना जेवण पार्सल देताना हरिभाऊ जोशी व त्यांचे पुत्र विक्रम जोशी.


कराड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या रक्षणासाठी दिवस-रात्र 24 तास आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावणारे पोलीस कर्मचारी यांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.  रस्त्यावर भर उनात जनतेची सेवा करण्याचे काम ते न थांबता करत असतात.  या प्रसंगी अनेक वेळा त्यांना उपाशीच बंदोबस्तासाठी तैनात व्हावे लागते .कधीही वेळेत जेवण मिळत नाही. अशा परिस्थितीत ते जनतेची सेवा करत असतात. कोरोना सारख्या महाभयानक विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव होत असून देखील सर्व पोलीस दादा स्वतःचा जीव धोक्यात घालून रस्त्यावर उतरून जनतेच्या सुरक्षेची काळजी घेत असतात.
कराडमधील माजी नगरसेवक हरिभाऊ जोशी दरवर्षी रामनवमीनिमित्त महाप्रसाद करत असतात. मात्र यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी हा कार्यक्रम रद्दद करण्यात आला होता. पण सामाजिक बांधिलकीचा वारसा लाभलेले हरिभाऊ जोशी यांनी माणसातील देव ओळखून त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांकडून प्रसाद म्हणून जेवण करून घेतले. व आपल्या सर्वांच्या कुटुंबाची, जनतेची  काळजी घेण्यासाठी बंदोबस्तासाठी तैनात असणाऱ्या पोलीस दादांना  घरी बनवलेले प्रसाद रुपी जेवण त्यांनी पोहोच केले. त्यांना बंदोबस्ताच्या ठिकाणी ते स्वतः व त्यांचा पुत्र विक्रम जोशी यांनी नेऊन दिले व पोलीस दादांना जेवू घातले.
त्यांनी आपल्या कार्यातून सामाजिक बांधिलकीचा वारसा जपला आहे .रस्त्यावर अखंड सेवा  करणाऱ्या पोलिस दादांची सेवा करण्याची संधी या निमित्ताने मिळाली. मी व माझे कुटुंबीय यामुळे समाधानी आहोत अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.


त्यांच्याप्रमाणे त्यांच्या मुंबई येथे वास्तव्यास असणाऱ्या मुलीने  ही आपला सामाजिक वारसा जोपासला आहे. गतवर्षी  पावसाच्या पाण्याने पूर येऊन मुंबई येथील अनेक घरात पाणी शिरले होते .अशा प्रसंगी या  संकटात  असणाऱ्या लोकांना जेवण देऊन मदतीचा हात पुढे केला होता.