गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंकडून पाटण मतदारसंघातील आरोग्य विभागाची पाहणी. वैद्यकीय यंत्रणा अलर्ट.

 



पाटण दि.०3 : कोरोना आजाराच्या पार्श्वभूमिवर पाटण विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र,उपकेद्रांमधील सोईसुविधा,रुग्णांना देण्यात येणारी सेवा,औषधांचा साठा इत्यादीबरोबर आरोग्य यंत्रणा तसेच कोरोना संदर्भात पाटणमधील विलगीकरण कक्ष हे व्यवस्थित आहे का ? याची पहाणी करणेकरीता आज राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी तारळे,मुरुड,केरळ या प्राथमिक आरोग्य केंद्राना व पाटणमधील विलगीकरण कक्षाला अचानक भेटी देवून आरोग्य विभागाचीच तपासणी केली. मतदारसंघात कोरोनाच्या पार्श्वभूमिवर वैद्यकीय सुविधा देणारी सर्व यंत्रणा अलर्ट असल्यामुळे ना.शंभूराज देसाईंनी समाधान व्यक्त करुन आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी व तालुका प्रशासनाचे कौतुक केले.


            कोरोना आजाराचा वाढता पाद्रुर्भाव लक्षात घेता पाटण विधानसभा मतदारसंघातील सर्व शासकीय यंत्रणा तसेच आरोग्य विभागाची यंत्रणा अलर्ट राहणेकरीता गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी एकदा नव्हे तर चारवेळा तहसिल कार्यालयामध्ये आढावा बैठका घेतल्या होत्या या पार्श्वभूमिवर मतदारसंघातील शासकीय यंत्रणा व आरोग्य यंत्रणा ही अलर्ट आहे का? हे पाहण्याकरीता त्यांनी आज प्रत्यक्ष पहाणी दौऱ्याचेच आयोजन करुन प्राथमिक आरोग्य केंद्राना अचानक भेटी देण्याचा कार्यक्रम राबविला.यामध्ये त्यांनी तारळे,मुरुड,केरळ या प्राथमिक आरोग्य केंद्राना व पाटणमधील विलगीकरण कक्षाला अचानक भेटी दिल्या.त्यावेळी कोरोना आजाराच्या पार्श्वभूमिवर सर्व यंत्रणा ही अलर्ट असल्याच्या त्यांच्या निदर्शनास आलेनंतर त्यांनी यासंदर्भात समाधानही व्यक्त करीत असेच सर्वांनी अलर्ट राहण्याच्या सुचना सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना दिल्या.


               सुरवातीस त्यांनी तारळे प्राथमिक आरोग्य केंद्रास तसेच मुरुड व केरळ प्राथमिक आरोग्य केंद्राना भेटी दिल्या यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र,उपकेद्रांमधील सोईसुविधा,रुग्णांना देण्यात येणारी सेवा,औषधांचा साठा याची त्यांनी प्रत्यक्ष पहाणी केली तसेच रुग्णालयांमध्ये पहिल्यापासून दाखल असणाऱ्या रुग्णांची वयोवृध्दांची जागेवर जावून त्यांनी विचारपुस केली तसेच त्यांना कसला त्रास होतोय,औषधे वेळेवर मिळतायतात का ? उपचार नीट होत आहेत का?  अशी रुग्णांना विचारणा करुन त्यांना दिलासा देण्याचे काम ना.शंभूराज देसाईंनी केले.तसेच प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मुंबई, पुणे तसेच बाहेर गांवाहून आलेल्या नागरिकांच्या तपासण्या केल्या का? त्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे तर आढळून आली नाहीत ना? बाहेरगावच्या नागरिकांना घरामध्ये त्यांचे विलगीकरण कुठे केले आहे का? केले असेल तर त्यांची तपासणी करण्यात येत आहे का? अशी विचारणा करुन याचीही माहिती ना.देसाईंनी घेतली.


            त्यानंतर त्यांनी पाटण येथील विलगीकरण कक्षाला भेट देत याठिकाणी आपण किती रुग्णांची सोय करु शकतो, त्यांना आरोग्य सुविधा देणेकरीता वैद्यकीय अधिकारी उपलब्ध आहेत का? नसतील तर किती वैद्यकीय अधिकारी यांची नेमणूक करावी लागणार याची माहिती प्रातांधिकारी श्रीरंग तांबे यांचेकडून घेतली.यावर प्रातांधिकारी तांबे यांनी पाटण येथील मुलाच्या वसतीगृहाच्या नुतन इमारतीमध्ये आपण विलगीकरण कक्ष स्थापन केले आहे यामध्ये एकुण २७ खोल्या व दोन मोठे हॉल असून यामध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने एकूण १०० ते ११० तसेच ग्रामीण रुग्णालय पाटण व ढेबेवाडी येथे अनुक्रमे १० असे एकूण १०० ते १५० नागरिकांची सोय करु शकतो याकरीता आवश्यक असणारी आरोग्य यंत्रणा उपलब्ध असून तशाप्रकारे वैद्यकीय अधिकारी यांच्या नेमणूका देखील करण्यात आल्या आहेत असे सांगितले.यावेळी ना.देसाईंनी विलगीकरण कक्षातील सर्व खोल्यांची तसेच मोठया दोन हॉलचीही यावेळी प्रत्यक्ष पहाणी केली. व सर्वच यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सुचना करीत त्यांनी पाटण मतदारसंघात काल तारखेपर्यंत मुंबई,पुणे, व बाहेरील गांवाहून किती नागरिक पाटण मतदारसंघात आले आहेत याचीही माहिती घेतली.कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सर्वच स्तरावर सर्व शासकीय यंत्रणा सज्ज असून रुग्णांना सेाईसुविधा देणारी आरोग्य व तालुका प्रशासनाची सर्व यंत्रणा अलर्ट असल्याचे पाहून गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी यंत्रणेसंदर्भात समाधान व्यक्त केले व सर्वांनी इतरांच्या काळजीबरोबर स्वत:चीही काळजी घेण्याच्या सुचना सर्वांना केल्या. यावेळी त्यांचेसोबत प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, तहसिलदार समीर यादव,उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात,गटविकास अधिकारी मीना साळुंखे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.आर.बी.पाटील,पाटण ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.चंद्रकांत यादव, सपोनि तृप्ती सोनवणे,पाटण नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक परदेशी यांची उपस्थिती होती .