लॉकडाऊनमध्ये वाधवान कुटुंबाचं पर्यटन : विशेष गृहसचिव अमिताभ गुप्ता सक्तीच्या रजेवर .

 गृह खात्याचे विशेष सचिव अमिताभ गुप्तांना पाठवले सक्तीच्या रजेवर.


मुंबई  / प्रतिनिधी :


दिवाण हाऊसिंग फाययान्स लिमिटेडचे (डीएचएफएल) संस्थापक वाधवान बंधूंना लॉकडाऊनच्या काळात खंडाळ्यातून महाबळेश्वरला जाण्यासाठी मदत करणारे राज्याचे गृह विभागाचे विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांच्यावर राज्य शासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. चौकशी होईपर्यंत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 


अमिताभ गुप्ता यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर करून वाधवान बंधूना लॉकडाऊन असतानाही महाबळेश्वरला जाण्यासाठी मदत केल्याचे समोर आल्यानंतर सरकारने त्यांच्यावर तत्काळ कारवाई केली आहे.याप्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी गुरुवारी रात्री उशिरा चर्चा केली. त्यानंतर गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. 


याप्रकरणी गृहमंत्र्यांनी आधीच चौकशीचे आदेश दिलेले असून ही चौकशी पूर्ण होईपर्यंत गुप्ता यांना सक्तीच्या रजेवरच रहावे लागणार आहे. ही कारवाई करताना कायदा सर्वांसाठी समान आहे, असेही गृहमंत्री देशमुख यांनी नमूद केले आहे.


वाधवान हे ‘फॅमिली फ्रेंड’ आणि महाबळेश्वरला ‘फॅमिली इमर्जन्सी’ – अमिताभ गुप्ता वाधवान यांच्याशी आपला व्यक्तिगत परिचय असून ते आपले ‘फॅमिली फ्रेंड’ आहेत आणि फॅमिलि इमर्जन्सीसाठी त्यांना खंडाळ्याहून महाबळेश्वरला जावे लागत आहे, असे गुप्ता यांनी वाधवान यांना दिलेल्या पत्रात म्हटले होते. 


या पत्रामुळे लॉकडाऊन व जिल्हाबंदी असतानाही वाधवान यांच्या मोटारींना रस्त्यात कोठेही आडवण्यात आले नाही. या पत्रात वाधवान यांच्या पाचही मोटारीचे क्रमांक तसेच त्यातून प्रवास करणाऱ्यांची यादी देखील दिली होती. गृह खात्याच्या अतिवरिष्ठ अधिकाऱ्याच्या या पत्रामुळे वाधवान कुटुंबाला खंडाळा ते महाबळेश्वर हा प्रवास विनासायास करता आला. 


सीबीआय चौकशी टाळण्यासाठी महाबळेश्वरला ?
डीएचएफएल व येस बँकेतील कोट्यवधींच्या घोटाळा प्रकरणी पॅरोलवर सुटका झालेल्या वाधवान बंधूंना सीबीआयने चौकशीसाठी समन्स बजावले आहे. लॉकडाऊनमुळे आपण चौकशीस उपस्थित राहू शकत नाही, असे उत्तर देणारे पत्र त्यांनी सीबीआयला पाठवल्याचे समजते. लॉकडाऊनच्या नावाखाली चौकशीचा ससेमिरा टाळण्याबरोबरच महाबळेश्वरला कुटुंबासह हवापालट करण्यासाठी गृह खात्याचा अतिवरिष्ठ अधिकारी त्यांना परवानगी कशी देऊ शकतो, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे .


Popular posts
चक्क सुपारीवर साकारलं श्रीमहालक्ष्मीचं चित्र.
इमेज
मंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून जलजिवन मिशन योजनेअंतर्गत पाटण तालुक्यातील 101 नळ पाणी पुरवठा योजनांसाठी 29 कोटी 30 लक्ष रुपयांचा निधी मंजूर.
इमेज
कराड जनता बँकेच्या 8 संचालकांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला. न्यायालयाचा कराड बँकेच्या संचालकांना दणका
इमेज
काकासाहेब चव्हाण महाविद्यालयाचा झेप नियतकालिक अंक वेधक व प्रेरणादायक : संजय देसाई
इमेज
तळमावले बिट मध्ये, पोषण माह अभियान अंतर्गत सदृढ बालक बालिका स्पर्धा उत्साहात संपन्न.
इमेज