लॉकडाऊन च्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा जनतेशी संवाद.


चिंता नको, तुम्ही माझ्या महाराष्ट्रात सुरक्षित आहात, मुख्यमंत्र्यांचा मजुरांना शब्द. 


मुंबई : कोरोनामुळे देशात 3 मेपर्यंत वाढलेला लॉकडाऊन आणि वांद्र्यात उसळलेल्या जीवघेण्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  आज पुन्हा एकदा राज्यातील जनतेशी संवाद साधला.
उद्धव ठाकरे यांच्या निवदेनातील महत्त्वाचे मुद्दे:


🔹कोरोना नंतर आणखी एक मोठं संकट येणार आहे हे संकट आर्थिक असेल.


 🔹आगामी काळात येणाऱ्या आर्थिक संकटाशी सामना करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात समिती करण्यात आली आहे.


 🔹शेतकरी आपला अन्नदाता, त्यांच्या कामात कोणताही अडथळा येणार नाही.
🔹 जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होत राहिल.


🔹20 एप्रिलनंतर कोणते उद्योग सुरु करता येतील यावर अजित पवार आणि त्यांची समिती निर्णय घेईल.
🔹 मुंबई आणि पुणे या शहरांमध्ये अधिक काळजी घेतली जात आहे.
🔹तुम्ही माझ्या महाराष्ट्रात सुरक्षित आहात, मजुरांना शब्द.
🔹गोरगरीब मजुरांच्या भावनांशी खेळू नका, त्याचं राजकारण करु नका.
🔹कुणीतरी गैरसमजाचं पिल्लू सोडल्यामुळे वांद्र्यातील गर्दी.
🔹तुम्ही परराज्यातून आले आहात,  तुम्हाला लॉक करुन ठेवण्यात आम्हाला आनंद नाही, मात्र काळजी करु नका, तुम्ही महाराष्ट्रात सुरक्षित आहात.
🔹कोरोनानंतर आर्थिक संकटाच्या सामन्यासाठी समिती स्थापन.
🔹आरोग्य यंत्रणेसाठी टास्क फोर्स सज्ज
विविध क्षेत्रातील तज्ज्ञांची समिती.
 🔹प्लाझमा ट्रिटमेंटआणि ईसीजी व्हॅक्सिनचे प्रयोग, यश आल्यास महाराष्ट्र जगाला दिशा देईल.