धारावीतील प्रत्येक नागरिकाची होणार कोरोना टेस्ट.


 


खासदार राहुल शेवाळे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत सहाय्यक आयुक्तांनी घेतला निर्णय.


मुंबई,दि. 9 : धारावीतील प्रत्येक नागरिकाची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेच्या वतीने घेण्यात आला आहे. स्थानिक खासदार राहुल शेवाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या आढावा बैठकीत, जी-उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी हा निर्णय घेतला. खासदार शेवाळे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, धारावीतील 150 खासगी डॉक्टरांनी पालिकेच्या मोहिमेत सहभागी होण्याची तयारी दाखविल्याने येत्या 10-12 दिवसांत संपूर्ण धारावी परिसरातील नागरिकांची कोरोना चाचणी करणे पालिकेला शक्य होणार आहे. सहाय्यक आयुक्तांच्या दालनात पार पडलेल्या या बैठकीत, खासदार शेवाळे, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे, इंडियन मेडिकल कौन्सिलचे उपाध्यक्ष डॉ. अनिल पाचनेकर, डॉ. सुरेंद्र सिगनापुरकर यांसह स्थानिक शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.


धारावीवरील कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर खासगी डॉक्टरांनी पालिकेच्या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन खासदार राहुल शेवाळे यांनी केले होते. या आवाहनाला, इंडियन मेडिकल कौन्सिल आणि महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने, धारावीतील 150 खासगी डॉक्टर्स पालिकेच्या मोहिमेत सहभागी होणार आहेत. या बैठकीनंतर पत्रकारांना माहिती देताना खासदार राहुल शेवाळे म्हणले की, "2 खासगी डॉक्टर्स आणि 3 पालिका वैद्यकीय कर्मचारी असे 5 जणांचे पथक सुमारे 5000 नागरिकांची चाचणी करणार आहे. अशा पथकांच्या माध्यमातून 10- 12 दिवसंत धारावीतील सुमारे साडे सात लाख नागरिकांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशा रीतीने त्वरित निदान झाल्यास बाधितांना धारावी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये उपचरारासाठी दाखल केले जाईल, तर लक्षणे आढळणाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात येईल."


याचबरोबर, धारावी पोलीस स्थानक आणि रुग्णालयांच्या ठिकाणी सॅनिटायझर टनेलही लवकरच उभारण्यात येणार असल्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.


Popular posts
सातारा जिल्ह्यात महामार्ग वगळता रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी, जिल्ह्यातील शाळा मात्र सुरु राहणार .
इमेज
कुंभारगाव विभागात कोरोनाचा पुन्हा प्रवेश.
इमेज
कोरोना संक्रमिक रुग्ण संख्येवर नियंत्रणासाठी जिल्हाधिकारी यांचे खाजगी डॉक्टर्स आणि हॉस्पिटलला आदेश
इमेज
शेंडेवाडी येथील दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह. जनतेने काळजी घेण्याचे डॉक्टरांचे आवाहन.
इमेज
मान्याचीवाडी ला "तालुका सुंदर गांव" पुरस्कार जाहीर.
इमेज