कराडमध्ये पहिला रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळला.कराड दि: काल 1 एप्रिल रोजी कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे दाखल असणाऱ्या अनुमानित रुग्णांच्या अहवाला पैकी एका पुरुष  रुग्णाचा (वय 35 वर्ष) अहवाल हा कोरोना (कोविड १९) बाधित असल्याचे एन . आय . व्ही पुणे यांनी कळविले आहे. इतर १८ अनुमानित रुग्णांचे अहवाल निगटिव्ह असल्याचेही एन.आय.व्ही. पुणे यांनी कळविले आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.