बांधकाममंत्री व गृहराज्यमंत्री यांच्यावतीने पाटण विधानसभा मतदारसंघातील ९५०० गरीब कुंटुबांना धान्याच्या वाटपास प्रारंभ.


बांधकाममंत्री व गृहराज्यमंत्री यांच्यावतीने
पाटण विधानसभा मतदारसंघातील ९५०० गरीब कुंटुबांना धान्याच्या वाटपास प्रारंभ.
         सातारा दि.२६:  कोरोनाच्या पार्श्वभूमिवर राज्यभर संचारबंदी करण्यात आली असून संचारबंदीच्या काळात पाटण विधानसभा मतदारसंघातील सुमारे ९५०० ग्रामीण आणि डोंगरी भागातील रोजगार बंद झालेल्या गोरगरीब कुटुंबाना तसेच हातावर पोट असणाऱ्या कुटुंबाना शिवसेना पक्षाच्या वतीने राज्याचे सार्वजनीक बांधकाम मंत्री ना.एकनाथ शिंदे व राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या वतीने १०-१० किलोचे पॅकेट तयार करुन धान्याचे वाटप करण्यास सुरुवात करण्यात आली असून हातावर पोट असणाऱ्या कुटुंबाना संचारबंदीच्या काळात  बांधकाम मंत्री ना.एकनाथ शिंदे व गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईनी मायेचा आधार दिला आहे.


          संचारबंदीच्या काळात सर्वत्र ग्रामीण भागातील जनता रोजगार बंद झाल्याने तसेच हातावर पोट असणाऱी कुटुंबे ही गेली महिनाभर घरीच बसून आहेत पाटण या ग्रामीण व डोंगरी मतदारसंघातही तीच परिस्थिती असून पाटण मतदारसंघातील रोजगार बंद झालेल्यांना तसेच हातावर पोट असणाऱ्या कुटुंबांना शासनामार्फत स्वस्त अन्नधान्य देणेची व्यवस्था शासकीय यंत्रणेमार्फत गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी केली आहे. महिन्याचे स्वस्त धान्यही संपत आले असल्याने शिवसेना पक्षाच्या वतीने राज्याचे सार्वजनीक बांधकाम मंत्री व विधानसभेतील पक्षाचे गटनेते ना.एकनाथ शिंदे व राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी पाटण मतदारसंघातील सुमारे ९५०० कुटुबांना आधार मिळणेकरीता १०-१० किलोचे अन्नधान्याचे एक पॅकेट तयार करुन ते वाटपाचे काम सुरु करण्यात आले आहे.
            या पॅकेटमध्ये गहू,तांदूळ,डाळ, तेल व साखर अशा जीवनावश्यक वस्तूंचा समावेश करण्यात आला असून  पाटण विधानसभा मतदारसंघातील डोंगरी आणि दुर्गम भागामध्ये गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यामार्फत ही धान्याची पॅकेट प्रत्येक कुटुंबाच्या घरी जावून कोरोनाच्या पार्श्वभूमिवर गांवागांवामध्ये तसेच वाडीवस्तीमध्ये शासनाच्या सर्व नियमांचे पालन करुन सामाजीक अंतर ठेवून वाटप करण्याच्या सुचना गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. त्यानुसार त्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याकडून या धान्याच्या पॅकेटच्या वाटपास सुरुवात करण्यात आली आहे.मतदारसंघातील प्रत्येक विभागात टप्प्याटप्प्याने हे धान्य वाटप करण्यात येणार आहे. मंगळवार दि.२८ एप्रिल पर्यंत पाटण विधानसभा मतदारसंघातील डोंगरी व दुर्गम भागातील गांवागावांतील तसेच वाडीवस्तीतील गरीब कुटुंबापर्यंत या धान्याचे वाटप पुर्ण होईल असेही ना.शंभूराज देसाईंनी सांगितले आहे.
           अडचणीच्या काळात पाटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई हे पाटण विधानसभा मतदारसंघातील गोरगरीब जनतेकरीता नेहमीच धावून आले आहेत. मागील वर्षीच्या अतिवृष्टीच्या संकटात पाटण विधानसभा मतदारसंघात अतिवृष्टी व महापुरात अडकून पडलेल्या जनतेला त्यांनी चांगल्या प्रकारे सर्वच प्रकारची मदत करुन दिलासा देण्याबरोबर आपले कर्तव्य जपण्याचे काम केले होते.  त्या संकटात विविध सेवाभावी संस्थाकडून तसेच दानशुर व्यक्तीकडून आवश्यक असणारे धान्य, कपडे यासारख्या जीवनावश्यक वस्तू एकत्रित करुन नुकसान झालेल्या जनतेपर्यंत पोहचविण्याचे कार्य त्यांनी केले होते. त्यानुसार आताही कोरोनाच्या संकटाचा सामना करण्याबरोबर ज्या व्यकतींचे रोजगार बंद झाले आहेत ज्या कुटुबांचे हातावर पोट आहे अशा कुटुंबाना आधार देणेकरीता त्यांनी पक्षाच्या वतीने तसेच राज्याचे सार्वजनीक बांधकाम मंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने पुढाकार घेतला असून या दोघांच्या प्रयत्नातून पाटण विधानसभा मतदारसंघातील सुमारे ९५०० गरीब कुटुंबापर्यंत जीवनावश्यक अशा धान्याचे पॅकेट पोहचणार आहे.