सोलापुरात कोरोनाचा पहिला बळी; मृत व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह.

 सोलापूर / प्रतिनिधी.
आतापर्यंत एकही कोरोनाचा रुग्ण नसलेल्या सोलापुरात एका रुग्णाच्या मृत्यूनंतर त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे सोलापुरात कोरोनाने शिरकाव केला असून पहिला बळी गेला आहे. याबाबतच्या वृत्तास जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दुजोरा दिला आहे. 
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णाचे वय 56 वर्षे असून शनिवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला होता. आज दुपारी 3.30 वाजता त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यानंतर पाच्छा पेठ परिसरात रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेतला जात असून परिसर सील करण्यात येत आहे.


Popular posts
कोरोना संक्रमिक रुग्ण संख्येवर नियंत्रणासाठी जिल्हाधिकारी यांचे खाजगी डॉक्टर्स आणि हॉस्पिटलला आदेश
इमेज
शेंडेवाडी येथील दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह. जनतेने काळजी घेण्याचे डॉक्टरांचे आवाहन.
इमेज
सातारा जिल्ह्यात 182 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; एका बाधिताचा मृत्यु
इमेज
मान्याचीवाडी ला "तालुका सुंदर गांव" पुरस्कार जाहीर.
इमेज
सातारा जिल्ह्यात महामार्ग वगळता रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी, जिल्ह्यातील शाळा मात्र सुरु राहणार .
इमेज