अवकाळी पावसाने तारूख परिसरात शेतकऱ्यांचे नुकसान.


ढेबेवाडी(वार्ताहर)
  सोमवार दि 13 रोजी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाले आहे .
     सोमवारी पडलेल्या वादळी वाऱ्यासह गारांच्या पडलेल्या पावसाने तारुख तालुका कराड सह तारुख परिसरात शेतकऱ्याचे मिरची ,घेवडा ,टोमॅटो आणि अडसाली ऊस इत्यादी  बागायत शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 
    वादळी पावसाने व गारपिटीने रतन पांडुरंग चव्हाण रा. बामणवाडी या शेतकऱ्यांचे घेवडा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले  आहे. गारपीट व वादळी वाऱ्याच्या पावसाने घेवडा पीक भुई सपाट झाले आहे.ऐन फुलभरात  आलेले पीक हातातून गेल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.