लॉकडाऊन मध्ये बिबट्याचा मात्र मुक्त संचार.


घोगांव येथील इराची पट्टी शिवारात बिबट्याचे दर्शन.  
 कराड दि.१६. काल सायंकाळी घोगाव तालुका कराड येथून जवळच असणाऱ्या इराची पट्टी शिवारात बिबट्याचे दर्शन ग्रामस्थांना झाले.
लॉकडाऊन मध्ये लोक घरात आहेत. मात्र वन्यप्राणी शेतात, रस्त्यावर मुक्तपणे संचार करताना आपण पहात आहोत. त्यांना जणू पूर्ण स्वातंत्र्य लाभल्याचा आनंद होताना दिसत आहे. हे वन्य प्राणी मोकळ्या असणाऱ्या रस्त्यावर. शेतात अगदी मुक्तपणे फिरताना दिसत आहेत. असाच एक बिबट्या येथून जवळच असणाऱ्या शेवाळवाडी ग्रामस्थांना काल दिसला .काल सायंकाळी या गावातील ग्रामस्थ तानाजी शेवाळे, सुनील शेवाळे, स्वस्कार शेवाळे, गावापासून जवळच असलेल्या कुंभारकी  नावाच्या रानात शेतीला पाणी देण्यासाठी जात असता इराची पट्टी या शिवारात त्यांना बिबट्या मुक्तपणे संचार करताना दिसला. यामुळे सदरचे ग्रामस्थ घाबरले.  येथून जवळच असलेल्या संभाजीनगर मधील लोकांच्यात यामुळे घबराट निर्माण झाली आहे.


Popular posts
ना. शंभूराज देसाई यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या ढेबेवाडी, कुंभारगाव व काढणे विभागातील विविध विकास कामाचे भूमिपूजन संपन्न.
इमेज
आधार फाऊंडेशनच्या वतीने ड्रायव्हर दिन साजरा.
इमेज
'रयत'च्या जनरल बॉडी सदस्यपदी निवड झाल्या बद्दल सारंग पाटील यांचा 'जनसहकार'च्या वतीने सत्कार.
इमेज
राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर निवड झाल्याबद्दल खा. श्रीनिवास पाटील यांचा 'जनसहकार' तर्फे सत्कार
इमेज
'उत्तर' कार्याला 'निराधारां'ना भरवला 'मायेचा' घास डाकवे परिवाराने जपले सामाजीक ऋण
इमेज