सातारा जिल्ह्यात आढळला सातवा कोरोना बाधित .


सातारा : सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णाचा निकट सहवासित 19 वर्षीय युवकाला जिल्हा रुग्णालयात विलगीकरण कक्षात अनुमानित रुग्ण म्हणून दाखल करण्यात आले होते. या युवकाच्या घशातील स्त्रावाचे नमुना रिपोर्ट हा कोरोना (कोव्हीड -19) पॉझिटिव्ह असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय पुणे यांनी कळविले आहे. त्यामुळे हा युवक कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. या रुग्णांवर मार्गदर्शक सुचनानुसार कोरोना संसर्गाचे उपचार चालू आहेत .