अत्यावश्यक सेवेची चालू असणारी सर्व दुकाने ठरविक वेळेत सुरु राहतील-जिल्हाधिकारी शेखर सिंह

 सातारा दि. 10 ( जि. मा. का ):  कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सातारा जिल्ह्यात कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यतील अत्यावश्यक बाबी वगळता सर्व प्रकारची दुकाने व आस्थापना पुढील आदेशापर्यंत बंद राहतील तर अत्यावश्यक सेवेची चालू असणारी सर्व दुकाने ठरविक वेळेत सुरु राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशानुसार कोरोना प्रादुर्भावानंतर  अत्यावश्यक सेवेची चालू ठेवलेली सर्व दुकाने उदा. किराणा सामान, दुध, औषध दुकाने, कृषि सेवा केंद्रे व अन्य जीवनावश्यक वस्तूंची दिनांक 11 एप्रिल पासून पुढील आदेशापर्यंत रोज सकाळी 8 ते सकाळी 11 वाजेपर्यंत, व सायंकाळी 7 वाजल्यापासून ते 9 वाजेपर्यंतच चालू राहतील.तथापि भाजीपाला विक्री केंद्रे फक्त सकाळी 8 ते 11 या वळेतच चालू राहतील. भाजीपाला केंद्रे संध्याकाळी चालू राहणार नाहीत.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द नियमानुसार कडक कारवाई करण्यात येऊन संबंधितांचा परवाना तात्काळ कायमस्वरुपी रद्द करण्यात  येवून साथरोग प्रतिबंधात्मक कायद्यानुसार, दंड प्रक्रीया संहिताचे कलम 144, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 या आदेशाचे उल्ल्ंघन केल्यास भारतीय दंड संहिता कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल. व संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमुद आहे.


Popular posts
चक्क सुपारीवर साकारलं श्रीमहालक्ष्मीचं चित्र.
इमेज
मंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून जलजिवन मिशन योजनेअंतर्गत पाटण तालुक्यातील 101 नळ पाणी पुरवठा योजनांसाठी 29 कोटी 30 लक्ष रुपयांचा निधी मंजूर.
इमेज
कराड जनता बँकेच्या 8 संचालकांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला. न्यायालयाचा कराड बँकेच्या संचालकांना दणका
इमेज
काकासाहेब चव्हाण महाविद्यालयाचा झेप नियतकालिक अंक वेधक व प्रेरणादायक : संजय देसाई
इमेज
तळमावले बिट मध्ये, पोषण माह अभियान अंतर्गत सदृढ बालक बालिका स्पर्धा उत्साहात संपन्न.
इमेज