सर्वसामान्यातील असामान्य नेतृत्व: मा.भरत पाटील


वाढदिवस विशेष .


आमचे कॉलेज जीवनापासूनचे मित्र गुढे तालुका पाटण गावचे सुपुत्र. पाटण तालुक्यात प्रतिकूल परिस्थितीत खऱ्या अर्थाने भाजपाचा झेंडा खांद्यावर घेऊन भाजप पक्षाची मुहूर्तमेढ रोवणारे विद्यार्थिदशेपासून सामाजिक चळवळीत असणारे, आपल्या सामाजिक ,राजकीय चळवळीत अनेक संकटांना सामोरे जाणारे. त्यावर मात करणारे, पराजयाने  निराश न होता.व विजयाने हुरळून न  जाता. सर्वसामान्य शेतकरी, तरुण केंद्रबिंदू मानून समाजसेवा करणारे, भाजपाचे सच्चे पाईक व निष्ठावंत नेते, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य ,प्रवक्ते भरत पाटील यांना दैनिक कृष्णाकाठ परिवाराच्यावतीने वाढदिवसानिमित्त लक्ष लक्ष शुभेच्छा.
ज्याप्रमाणे फिनिक्स पक्षी राखेत जन्माला येतो परंतु तो आकाशात उंच भरारी घेतो. गगनाला गवसणी घालतो .त्याप्रमाणे सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेल्या या सुपुत्राने परिस्थितीची जाण ठेवत जीवनात अनेक संकटांशी सामना करत जिद्द, चिकाटी, प्रचंड आत्मविश्वास, प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर राजकीय व सामाजिक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे.
भाजपाचे प्राथमिक सदस्य, तालुकाप्रमुख, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष, भाजपा जिल्हाध्यक्ष व सध्याचे प्रदेश कार्यकारणी सदस्य, प्रवक्ते अशी राजकीय चढती कमान प्राप्त करणारे, अनेक विजयी शिखरे पादाक्रांत करणारे असे हे युवा नेतृत्व.
शासनाच्या विविध जिल्हा व राज्य पातळीवरच्या समितीवरील नियुक्ती असो वा पक्षीय पदे असोत या सर्व पदांना त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला. राजकीय जीवनात मिळालेल्या विविध संधींचे त्यांनी सोने केले. व भाजपा पक्षात स्वतःचा एक वेगळा दबदबा निर्माण करून राज्य व देश पातळीवर एक वेगळा ठसा उमटवला व नावलौकिक प्राप्त केला.
अशा सामान्यातील असामान्य व्यक्तिमत्वास, त्यांच्या भावी आयुष्यामध्ये सामाजिक व राजकीय वाटचालीस दैनिक कृष्णाकाठच्या वतीने लाख लाख शुभेच्छा.


संपादक: चंद्रकांत चव्हाण.


 
Popular posts
मंत्री शंभूराज देसाई यांची उद्या दौलतनगर येथे सभा. शक्ती प्रदर्शनाकडे जिल्ह्याचे लक्ष
इमेज
"आर.आर.(आबा) पाटील सुंदर गाव" पुरस्काराने मान्याचीवाडीचा गौरव ; मान्याचीवाडी ठरले जिल्हयातील स्मार्टग्राम.
इमेज
विनायक मेटे यांचा कार अपघातात अकाली मृत्यू! मराठा आरक्षण आंदोलनाचा आवाज हरपला
इमेज
कुंभारगाव ग्रामपंचायत मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा. सरपंच सौ. सारिका पाटणकर यांचे शुभहस्ते ध्वजारोहण संपन्न.
इमेज
कुंभारगाव येथे "हर घर तिरंगा "रॅली संपन्न.
इमेज