कुस्ती संघटक मा.पै.तानाजी चवरे (आप्पा) - "कुस्ती मल्लविद्या FACEBOOK LIVE" द्वारे वस्ताद व कुस्तीप्रेमी यांच्याशी साधणार संवाद.


कुस्ती संघटक मा.पै.तानाजी चवरे (आप्पा) -कुस्ती मल्लविद्या FACEBOOK LIVE च्या माध्यमातून पैलवान व वस्ताद मंडळी,कुस्ती प्रेमी  यांच्याशी  बुधवार दि.२२ एप्रिल रोजी  साधणार संवाद....
 
 उंडाळे / प्रतिनिधी
                 कुस्ती मल्लविद्या महासंघ महाराष्ट्र राज्यचे संस्थापक पै.गणेश मानुगडे-सर  यांच्या संकल्पनेतुन सुरू असलेल्या उपक्रमाद्वारे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे यामुळे गावोगावी होत आसलेली कुस्ती मैदाने रद्द झाली आहेत या काळात पैलवान मंडळी वस्ताद मंडळी यांच्याशी कोरोना विषाणू विषयी घ्यावयाची काळजी तसेच कुस्ती मैदाने बंद असल्यामुळे नियमित व्यायाम, कुस्ती मेहनत सकस आहार कोरोना पासुन बचावासाठी कोण कोणती काळजी घेणे या विषयावर कुस्ती मल्लविद्या महासंघ महाराष्ट्र  राज्य प्रवक्ते पै.तानाजी चवरे (आप्पा) - साळशिरंबेकर  हे   सर्वांशी साधणार संवाद...
      यापुर्वी ही  कुस्ती राष्ट्रकुल सुवर्ण पदक विजेते पै.राहुल आवारे(नाना)  , महान भारत केसरी पै.माऊली जमदाडे, महाराष्ट्र केसरी पै आभिजीत कडके, उपमहाराष्ट्र केसरी पै.किरण भगत , जेष्ठ कुस्ती निवेदक पै.शंकर पुजारी (आण्णा) व पै.राहुल जाधव   डॉ.सुजीत निलेगावाकर या  कुस्तीतील  जानकार मंडळींनी संवाद साधला असुन या उपक्रमास संपूर्ण महाराष्ट्र सह  देशभरातुन  चांगला  प्रतिसाद मिळत आहे यानंतर ही कुस्ती क्षेञातील अनेक  हिंदकेसरी ,महाराष्ट्र केसरी  मल्ल   सम्राट,वस्ताद मंडळी नामवंत पैलवान व कुस्ती प्रेमी ,पञकार  इ.मंडळी कुस्ती मल्लविद्या FACEBOOK LIVE च्या माध्यमातून सर्वांशी संवाद साधणार आहेत आशी माहीती कुस्ती मल्लविद्याचे  पदाधीकारी पै.सोमनाथ चव्हाण,पै.राहुल जाधव (चिंचोली)पै.शाहाजी साळुंखे,पै.अमोल मदने(आबा) पै.आनंदराव पाटील (मिस्ञी), पै.राहुल पाटील (खुजगाव) पै.विकास शिरसट व पै.बाळासाहेब वाघमारे  यांनी दिली..