महाराष्ट्र दिनाचा ध्वजारोहण साधेपणाने ; फक्त जिल्हाधिकारी कार्यालयात होणार कार्यक्रम.


महाराष्ट्र दिनाचा ध्वजारोहण साधेपणाने ; फक्त जिल्हाधिकारी कार्यालयात होणार कार्यक्रम


सातारा दि. 29 ( जि. मा. का ) : कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी 1 मे महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम अत्यंत साधेपणाने आयोजित करण्यात येणार आहे. महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम केवळ जिल्हा मुख्यालयातील जिल्हाधिकारी कार्यालय येथेच सकाळी 8 वाजता ध्वजारोहण करण्यात येणार आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे यांनी दिली आहे.


या 1 मे महाराष्ट्र दिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमाला पालकमंत्री बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते हे महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. इतर मान्यवरांना या कार्यक्रमास आमंत्रित करण्यात येणार नाही तसेच कवायतीचे आयोजन करण्यात येणार नाही, अशीही माहिती निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे यांनी दिली.


Popular posts
लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून उद्या कराड तालुक्यात बंदची हाक.
इमेज
कुंभारगाव, चाळकेवाडी परिसरात वन्यप्राण्यांकडून शेळीवर हल्ला. दोन शेळ्यांचा घेतला जीव.
इमेज
युवा नेते यशराज देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त काळगाव व कुंभारगाव विभाग शिवसेनेच्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न‌.
इमेज
गोरखगड पाठोपाठ सह्यपुत्रांची हरिश्चंद्रगडाची मोहीम फत्ते.
इमेज
स्व.यशवंतराव चव्हाण साहेबांचे कार्य सैनिक स्कूलमधील विद्यार्थ्यांना समजले पाहिजे : खा.श्रीनिवास पाटील
इमेज