कोरोना बाधिताचा निकट सहवासिताचा रिपोर्ट आला पॉझिटिव्ह.


सातारा (जिमाका) दि.19: क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे  कोरोनाबाधित रुग्णांचा निकट सहवासित असलेल्या 17 वर्षीय युवकास या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्याचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला होता.   आता काल त्याच्याशी  घशातील स्त्रावाचा नमुना पुर्नतपासणीसाठी बी.जे. वैद्यकीय महविद्यालय पुणे येथे पाठविण्यात आला होता. या तपासणीत या युवकाचा अहवाल कोरोना (कोव्हीड19) बाधित असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.