रानडुकराच्या शिकार प्रकरणी चार जण वन विभागाच्या ताब्यात.

 



ढेबेवाडी, दि.  : रानडुकराच्या शिकार प्रकरणी निनाईवाडी कसणी, ता. पाटण येथील चार जणांना वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी पकडून वन्यजीव शिकार प्रकरणी कारवाई केली. 


याबाबत भोसगाव वनरक्षक एस. एस. राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार निनाईवाडी( कसणी) येथील ज्ञानदेव रामचंद फडकर (वय 27), सखाराम गणपत फडकर (वय 38), भाऊ किसन कदम (वय 26), गणपत रामचंद फडकर (वय 35) हे चौघे जण घोटील येथील घागरतळ नावाच्या वनक्षेत्रातील हद्दीत शिकारीसाठी दि. 14 रोजी गेले होते. 


पाळीव कुत्र्यांच्या मदतीने त्यांनी सुमारे चार महिने वयाच्या रानडुकरांच्या पिल्लाची शिकार केली. ही बाब वनमजूर धनाजी पवार यांनी पाहिली. त्यांनी लगेच ही बाब भोसगाव वनरक्षक एस. एस. राऊत, घोटील वनरक्षक जयवंत बेंद्रे, वनरक्षक अमर पन्हाळे यांना कळविली. यानुसार वन्यजीव शिकार प्रकरणी चौंघाच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली.