सातारा जिल्ह्यात चार रुग्ण पॉझिटिव्ह.


जिल्ह्यात चार रुग्ण पॉझिटिव्ह.


सातारा : कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे विलगीकरण कक्षात दाखल असणाऱ्या 10 महिन्याच्या पुरुष जातीचे बाळ व 28 वर्षीय पुरुष आणि उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे दाखल असणाऱ्या 75 वर्षीय महिला तसेच उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथे दाखल असणाऱ्या 27 वर्षीय महिला अशा 4 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. जिल्ह्यात कोरोना संसर्ग रुग्णांची संख्या एकूण 7 होती. त्यापैकी एका रुग्णाचा अहवाल 14 दिवसानंतर निगेटिव्ह आला असून हा रुग्ण पूर्णपणे बरा झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. तसेच 2 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. 4 कोरोना संसर्गितांवर मार्गदर्शक नियमानुसार कोटेकोरपणे निगराणीखाली उपचार सुरु आहेत. जिल्ह्यात आता एकूण 8 रुग्ण पॉझिटिव्ह आहेत.


 


फलटण 1
डेरवण, ता. पाटण येथील 10 महिन्याच्या मुलाचा


ओगलेवाडी, ता. कराड येथील रेल्वे कर्मचाऱ्याचा व महारुगडेवाडी, ता. कराड येथील कोरोनाबधित मृताच्या नातेवाईकाचा समावेश


आजपर्यंत कोरोनाग्रस्त संख्या 11
मृत 2
बरा 1
सध्या कोरोनाग्रस्त 8