कराड मध्ये श्वसन संस्थेच्या तीव्र जंतु संसर्गामुळे दोघांचा मृत्यु.

 



कराड मध्ये श्वसन संस्थेच्या तीव्र जंतु संसर्गामुळे दोघांचा मृत्यु.
40 अनुमानित विलगीकरण कक्षात दाखल.



कराड :   प्रतिनिधी -
क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 4 नागरिकांना बाधित रुग्णाचे निकट सहवासित म्हणून तर 2 नागरिकांना श्वसन संस्थेच्या तीव्र जंतु संसर्गामुळे व प्रवास करुन आलेले 2 नागरिक आणि 1 आरोग्य कर्मचारी असे एकूण 9 जणांना तर कृष्णा मेडिकल, कॉलेज, कराड येथे बाधित रुग्णाचे निकट सहवासित म्हणून 22 नागरिक व श्वसन संस्थेच्या तीव्र जंतु संसर्गामुळे 7 नागरिकांना तसेच उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे 4 असे एकूण 42 नागरिकांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. यापैकी कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे विलगीकरण कक्षात दाखल असणाऱ्या 70 वर्षीय महिला व उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे दाखल असणाऱ्या 32 वर्षीय पुरुष या दोघांचा मृत्यु  श्वसन संस्थेच्या तीव्र जंतु संसर्गामुळे झाला आहे. या दोघांच्या घशातील स्त्रावांचे नमुने संशयित म्हणून बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले असून उर्वरित 40 नागरिकांच्या  घशातील स्त्रावांचे नमुनेही   बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे, अशी माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
 


Popular posts
ना. शंभूराज देसाई यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या ढेबेवाडी, कुंभारगाव व काढणे विभागातील विविध विकास कामाचे भूमिपूजन संपन्न.
इमेज
आधार फाऊंडेशनच्या वतीने ड्रायव्हर दिन साजरा.
इमेज
'रयत'च्या जनरल बॉडी सदस्यपदी निवड झाल्या बद्दल सारंग पाटील यांचा 'जनसहकार'च्या वतीने सत्कार.
इमेज
राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर निवड झाल्याबद्दल खा. श्रीनिवास पाटील यांचा 'जनसहकार' तर्फे सत्कार
इमेज
'उत्तर' कार्याला 'निराधारां'ना भरवला 'मायेचा' घास डाकवे परिवाराने जपले सामाजीक ऋण
इमेज