कराड येथील विलगीकरण कक्षात असलेल्या 60 वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह .


सातारा : कृष्णा हॉस्पीटल, कराड येथे दाखल करण्यात आलेल्या 7 अनुमानित रुग्णांपैकी 60 वर्षीय पुरुष कोरोना (कोव्हीड -19) रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून तो कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. तर उर्वरित 6 जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. तसेच जिल्हा रुग्णालयातील कोरोना बाधीत 9 निकट सहवासितांचे घशातील स्त्रावाचा नमुनेही निगेटिव्ह आले असल्याचे एन.आय.व्ही. पुणे यांनी कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे काल 6 एप्रिल रोजी जिल्हा रुग्णालयात दाखल असणाऱ्या कोविड-19 बाधीत रुग्णाच्या चौदा निकट सहवासितांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. तसेच खासगी रुग्णालयात श्वसन संस्थेच्या तीव्र जंतु संसर्गामुळे 2 रुग्ण दाखल विलगीकरण कक्षात दाखल केले आहेत. या एकूण 16 जणांच्या घशातील स्त्रावाचे नमुने एन. आय. व्ही. पुणे येथे पाठविण्यात आले आहेत. तसेच काल दुपारी जिल्हा रुग्णालय सातारा येथे तीव्र जंतु संसर्गामुळे दाखल झालेला 25 वर्षीय अनुमानित अत्यावस्थ झाल्याने रात्री 1 च्या सुमारस त्याला कृष्णा मेडिकल कॉलेज येथे दाखल केले असून विलगीकरण कक्षात लागू असलेल्या नियमानुसार उपचार चालू आहेत, असेही डॉ. गडीकर यांनी कळविले आहे .


Popular posts
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुंभारगाव येथील त्रिपुरी पौर्णिमेची यात्रा रद्द.
Image
साताऱ्यात २३ नोव्हेंबर पासून शाळा सुरू; जिल्हाधिकाऱ्यांचे शाळा व्यवस्थापनाला आदेश.
Image
कोरोना संसर्गाची दुसरी लाट थोपविण्यासाठी ; नागरिकांनी सूचनाचे पालन करावे, अन्यथा कारवाई करणार - जिल्हाधिकारी शेखर सिंह
Image
पाटण तालुका पत्रकार संघामार्फत ढेबेवाडी विभागातील कोरोना योध्यांचा सन्मान.
Image
ना.शंभूराज देसाईंमुळे पाटण ग्रामीण रुग्णालय झाले उपजिल्हा रुग्णालय;100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय स्थापन करण्यास शासनाची मान्यता.
Image