चित्रकार डाॅ.संदीप डाकवे यांनी ‘पेपर कटींग आर्ट’ मधून साकारले मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे पोट्रेट.


तळमावले/वार्ताहर
गेले अनेक दिवसापासून देशासह राज्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या मार्गदर्शनाखाली डाॅक्टर, नर्सेस, पोलीस, प्रशासन अधिकारी चांगले काम करत आहेत. अतिशय महत्त्वाच्या काळात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी प्रशासनाला चांगल्या सुचना केल्यामुळे त्यांना प्रोत्साहनपर सलाम युवा चित्रकार डाॅ.संदीप डाकवे यांनी केला आहे. ‘पेपर कटींग आर्ट’ या आगळ्या वेगळ्या कलेच्या माध्यमातून डाॅ.संदीप डाकवे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे अनोखे पोट्रेट तयार केले आहे. या पोट्रेटच्या माध्यमातून त्यांनी कोरोनाविरुध्द लढणाऱ्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह त्यांच्या संपूर्ण टीमला सलाम केला आहे. पेपर कटींग आर्टच्या माध्यामातून तयार केेलेल्या या पोट्रेटची साईज 12 बाय 18 इंच इतकी आहे.
देशात 21 एप्रिलपर्यंत लाॅकडाऊन आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे प्रशासन आणि नागरिकांना चांगले मार्गदर्शन करत आहेत. व परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम करत आहेत. अशा वेळी बरेच कलावंत कलेतून घरीच करमणूक करण्याचा प्रयत्न करत आहेत. उध्दव ठाकरे यांना चित्रातून पण वेगळया पध्दतीने मानवंदना देण्यासाठी डाॅ.संदीप डाकवे यांनी हे पोट्रेट केले आहे. डाॅ.संदीप डाकवे यांच्या कलेची दखल ‘इंडिया बुक आॅफ रेकाॅर्ड’ या पुस्तकात दोनदा घेतली गेली आहे.


◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾


🔸प्रशासनाला साथ देण्याचे आवाहन:
डाॅ. संदीप डाकवे यांनी घरात राहूनच ‘पेपर कटींग आर्ट’ मधून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे अनोखे पोट्रेट साकारले आहे. त्यामुळे लाॅकडाऊनमध्ये आपण घरीच राहून आपल्या कलागुणांना वाव द्यावा आणि कोरोनाविरुध्दच्या या लढयात सरकार आणि प्रशासन यांना साथ देवून हा लढा जिंकूया असे आवाहन युवा चित्रकार डाॅ.संदीप डाकवे यांनी केले आहे.


◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾◾