चेहऱ्यावर मास्क परिधान न करणाऱ्यांना 500 रुपये दंड: जिल्हाधिकारी शेखर सिंह.


चेहऱ्यावर मास्क परिधान न करणाऱ्यांना 500 रुपये दंड आकारणार: जिल्हाधिकारी


 सातारा दि.23 (जि.माका) : कोरोना प्रार्दुभाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी अत्यावश्यक बाबी व सेवा यांच्यासाठी घरामधून बाहेर पडण्यापासून परत घरी येईपर्यंत चेहऱ्यावर मास्क परिधान करणे बंधनकारक केले होते. परंतू शहरी व ग्रामीण भागातील बरेचसे नागरिक मास्क न वापरता विनाकारण रस्त्यावर फिरत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.  जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कडक उपाययोजना म्हणून मास्क वापरण्याचे आवाहन करुन विना मास्क परिधान करता घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना 500 रुपये इतका दड आकारण्याचे आदेश दिले आहेत.
या दंडाची आकारणी ग्रामस्तरावरील ग्रामसेवक/ग्रामपंचायत कर्मचारी यांनी व शहरी भागातील संबंधित नगरपालिका विभाग किंवा नगरपालिका कर्मचारी यांनी करावी. तसेच याबाबत इतर विभागाच्या कर्मचाऱ्यांनी संबंधित भौगोलिक क्षेत्रात दंडाची वसूली केल्यास ती त्या स्थानिक स्वराज संस्थेमध्ये जमा करण्याचे आदेश दिले आहेत.