कराड तालुक्यात कोरोनाचा हाहाकार.आज 5 रुग्ण पॉझिटिव्ह.


सातारा जिल्ह्याला कोरोनाचा विळखा. आज आणखी 6 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह.सातारा 41,तर कराड 30.


कराड दि:  कोरोना हॉटस्पॉट बनलेल्या कऱ्हाड तालुक्यातील वनवासमाची आणि आगाशिवनगर येथील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आज आणखी पाच रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे आरोग्य विभागाच्या तपासणी अहवालातुन समोर आले आहे. कऱ्हाडात कोरोनाची साखळी थांबायलाच तयार नाही. एकट्या कऱ्हाड तालुक्यात कोरोनाबाधित रूणांची संख्या 30 झाली आहे.
कऱ्हाड तालुक्याची चिंता अधिकच वाढली असून हा तालुका जिल्ह्यातील सर्वाधिक कोरोनाबाधित रूग्ण असलेला तालुका बनला आहे. जिल्हा प्रशासनाने कऱ्हाडवर लक्ष केंद्रीत केले आहे.
वनवासमाची आणि आगाशिवनगर येथील बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढत होतआहे. परिणामी ती दोन्ही गावे कऱ्हाड तालुक्यासाठी कोरोना हॉटस्पॉटच बनली आहेत.
संबंधित दोन्ही ठिकाणीच कोरोनाबाधितांची संख्या मोठ्याप्रमाणात आहे. त्यामुळे तेथील साखळी तोडण्याचे आव्हानच प्रशासना समोर होवून  बसले आहे.
आज त्यामध्ये आणखी पाच रुग्णांची वाढ झाली असून वनवासमाची व आगाशिवनगर येथील रुग्णांचा त्यामध्ये समावेश आहे. त्यामुळे तालुक्यातील बाधितांची संख्या 30 वर पोचली आहे.
दरम्यान, पुणे येथून प्रवास करुन आलेल्या फलटण येथील 28 वर्षीय युवक कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे बीजे वैद्यकिय महाविद्यालयातून आलेल्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळेे सातारा जिल्ह्याची कोरोना बाधित संख्या 41 इतकी झाली आहे.


Popular posts
गुढे वि. का स. सेवा सोसायटी निवडणुकीत शिवसेनेचा 13 - 0 ने मोठा विजय. राष्ट्रवादीच्या पॅनेलचा दारुण पराभव. 20 वर्षांनंतर सत्तातर .
इमेज
बनपुरी सोसायटीत शिवसेना पुरस्कृत स्व. रघुनाथ महादेव पाटील शेतकरी विकास पॅनेलचा 13-0 ने दणदणीत विजय
इमेज
काळगांव मध्ये तब्बल 22 वर्षानंतर भेटले वर्गमित्र
इमेज
सारंग पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त शाळेतील मुलांना संजीवन प्रतिष्ठान व नवभारत पतसंस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकी ,
इमेज
काळगाव सोसायटीत विजय तरुणाईचा..
इमेज