3 वर्षाचा निकट सहवासित मुलगा कोरोना बाधित. सातारा जिल्ह्यात आणखी एका कोरोना रुग्णांची वाढ.

 


3 वर्षाचा निकट सहवासित मुलगा कोरोना बाधित.


सातारा दि. 22( जि. मा. का ) : क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दाखल असलेल्या कोरोनाबाधित रुग्णाच्या  निकट सहवासित 3 वर्षीय मुलाचा  कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने  हा मुलगा कोरोना बाधित. असलयाची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
तसेच विलगीकरण कक्षात दाखल असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांचा 14 दिवसानंतरचा तपासणीसाठी पाठविण्यात आलेला घशातील स्त्रावाचा नमुना पॉझिटिव्ह असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय पुणे यांनी कळविले असून  वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार आणखी पाच दिवस त्याच्यावर उपचार व पुर्नतपासणी करण्यात येणार असल्याची माहितीही श्री. गडीकर यांनी दिली.
आता सातारा जिल्ह्यात 13  रुग्ण कोविड बाधित असून आता पर्यंत 3 (कोविड19) मुक्त होऊन रुग्णालयातून सोडले आहेत तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे.