वांग खोऱ्यात वादळी पावसाची दमदार हजेरी.


वांग खोऱ्यात वादळी पावसाची दमदार हजेरी.


ढेबेवाडी (वार्ताहर)


सोमवारी दि 13 रोजी सायंकाळी ढेबेवाडी तसेच  तळमावले परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह वाळवाच्या पाऊसाने हजेरी लावली .
 वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडात  सुमारे एक तास गारांचा मुसळधार पाऊस पडत होता. गारांचा जणू सडा सर्व रस्त्यावर दिसत होता. गार  वाऱ्यासह  कमालीचा गारवा वातावरणात जाणवत होता. या मुसळधार वादळी पावसामुळे विभागात कोणतेही नुकसान  झाले नसल्याचे वृत्त आहे .