सातारा व कराड येथील 22 अनुमानित रुग्णांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह.


सातारा: सातारा जिल्हा रुग्णालयात दाखल असणाऱ्या दाेन आणि कराड कृष्णा मेडीकल कॉलेज कराड येथे दाखल असणाऱ्या 13 तर कोरेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल असणाऱ्या सात अशा 22 अनुमानित रुग्णांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय पुणे यांनी कळविले आहे.
 
दिल्ली व इतर राज्यात प्रवास करुन आलेले 3 नागरीकांना तसेच श्वसन संस्थेच्या तीव्र जंतूसंसर्गामुळे एका नागरिकास जिल्हा रुग्णालयात कोरोना अनुमानित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या चार अनुमानित रुग्णांच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी बी.जे.वैद्यकीय महाविद्यालय पुणे येथे पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.  


सातारा जिल्ह्यातील नागरिकांनी घरीच सुरक्षीतपणे थांबावे आणि काेराेनाशी लढत द्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. 
  • सातारा जिल्ह्यातील (रविवार 12) सायंकाळ पाच वाजताची एन करोना 19 (कोव्हिड 19) आकडेवारी पुढील प्रमाणे 

 • जिल्हा शासकीय रुग्णालय-    244

 • कृष्णा हॉस्पीटल, कराड-    176

 • खाजगी हॉस्पीटल-    4

 • एकूण दाखल -    424

 • प्रवासी-108, निकट सहवासीत-232, श्वसन संस्थेचा तीव्र जंतू संसर्ग-84 = एकूण 424

 • 14 दिवसानंतर कोरोना नमुने घेतलेले-    4

 •   कोरोना नमुने घेतलेले एकूण-    428

 •  कोरोना बाधित अहवाल -    7

 •  कोरोना अबाधित अहवाल -    369

 •     अहवाल प्रलंबित -    48

 •     डिस्चार्ज दिलेले-    370

 •     मृत्यू    2

 •     सद्यस्थितीत दाखल-    52

 •     आलेली प्रवाशी संख्या (दिनांक 12.4.2020) -    848

 •     होम क्वारान्टीनमध्ये असलेल्या व्यक्ती -    848

 •     होम क्वारान्टीन पैकी 14 दिवस पूर्ण झालेल्या व्यक्ती -    547

 •     होम क्वारान्टीन पैकी 14 दिवस पूर्ण न झालेल्या व्यक्ती –    301

 •     संस्थेमध्ये अलगीकरण केलेले-    131

 •     आज दाखल    4

 •     यापैकी डिस्जार्ज केलेले-    71

 •     यापैकी शासकीय रुग्णालय जनरल वार्डात-    0

 •   अद्याप दाखल -    57


Popular posts
ना. शंभूराज देसाई यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या ढेबेवाडी, कुंभारगाव व काढणे विभागातील विविध विकास कामाचे भूमिपूजन संपन्न.
इमेज
'रयत'च्या जनरल बॉडी सदस्यपदी निवड झाल्या बद्दल सारंग पाटील यांचा 'जनसहकार'च्या वतीने सत्कार.
इमेज
आधार फाऊंडेशनच्या वतीने ड्रायव्हर दिन साजरा.
इमेज
राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर निवड झाल्याबद्दल खा. श्रीनिवास पाटील यांचा 'जनसहकार' तर्फे सत्कार
इमेज
'उत्तर' कार्याला 'निराधारां'ना भरवला 'मायेचा' घास डाकवे परिवाराने जपले सामाजीक ऋण
इमेज