आज 21 अनुमानित नागरिक विलगीकरण कक्षात दाखल

 



सातारा दि. 17 ( जि. मा. का ): क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 6, कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे 8 आणि उपजिल्हा रुग्णालय कराड येथे 7 अशा एकूण 21 नागरिकांना कोरोना अनुमानित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यिचिकित्सक  डॉ. आमोद  गडीकर यांनी दिली आहे. 
तसेच क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील एका कोरोनाबाधित रुग्णांस 14 दिवस पूर्ण झाल्याने त्याच्या घशातील स्त्रावाचा नमुना देखील तपासणीकरीता बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आला असल्याचीही माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली आहे.