101 अनुमानितांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह;19 जणांना केले विलगीकरण कक्षात दाखल .


सातारा दि. 19 ( जि. मा. का ): क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दाखल असणाऱ्या 7, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे दाखल असणाऱ्या 58, उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे दाखल असणाऱ्या 19, उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथे दाखल असणाऱ्या 11, ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथे दाखल असणाऱ्या 5 व ग्रामीण रुग्णालय वाई येथे दाखल असणाऱ्या 1 अशा एकूण 101 अनुमानित रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला असल्याचे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 3, उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथे 15, व ग्रामीण रुग्णालय, वाई येथे एक अशा एकूण 19 जणांना अनुमानित म्हणून दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही  डॉ.  गडीकर यांनी दिली आहे. 


Popular posts
ना. शंभूराज देसाई यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या ढेबेवाडी, कुंभारगाव व काढणे विभागातील विविध विकास कामाचे भूमिपूजन संपन्न.
इमेज
'रयत'च्या जनरल बॉडी सदस्यपदी निवड झाल्या बद्दल सारंग पाटील यांचा 'जनसहकार'च्या वतीने सत्कार.
इमेज
आधार फाऊंडेशनच्या वतीने ड्रायव्हर दिन साजरा.
इमेज
राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर निवड झाल्याबद्दल खा. श्रीनिवास पाटील यांचा 'जनसहकार' तर्फे सत्कार
इमेज
'उत्तर' कार्याला 'निराधारां'ना भरवला 'मायेचा' घास डाकवे परिवाराने जपले सामाजीक ऋण
इमेज