कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची "टास्क फोर्स समिती" स्थापन.

 व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे काँग्रेसच्या  "टास्क फोर्स" समितीला मार्गदर्शन करताना समितीचे अध्यक्ष आमदार. पृथ्वीराज चव्हाण.


कराड .दि.  महाराष्ट्रात कोरोना ग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने कोरोना विरुद्ध लढण्यासाठी, हे संक्रमण रोखण्यासाठी अनेक उपाय योजना प्रभावीपणे राबविल्या आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने कोरोना साथीच्या पार्श्‍वभूमीवर कराड दक्षिणचे आमदार. पृथ्वीराज चव्हाण ( बाबा  ) यांच्या अध्यक्षतेखाली 22 सदस्यीय " टास्क फोर्स समिती." नुकतीच स्थापन केली आहे. गुरुवार दिनांक 9 रोजी या समितीची प्रदेश काँग्रेसने घोषणा केली. आज आमदार. पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली या सर्व समिती सदस्यांची पहिली मिटिंग व्हिडीओ कॉन्फरन्स च्या माध्यमातून पार पडली. यावेळी समितीच्या सदस्यांना मार्गदर्शन करण्यात आले. कोरोनाचे  हे संकट दूर करण्यासाठी सरकार व प्रशासना सोबत काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते सज्ज आहेत.


Popular posts
कोरोना संक्रमिक रुग्ण संख्येवर नियंत्रणासाठी जिल्हाधिकारी यांचे खाजगी डॉक्टर्स आणि हॉस्पिटलला आदेश
इमेज
शेंडेवाडी येथील दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह. जनतेने काळजी घेण्याचे डॉक्टरांचे आवाहन.
इमेज
सातारा जिल्ह्यात 182 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; एका बाधिताचा मृत्यु
इमेज
मान्याचीवाडी ला "तालुका सुंदर गांव" पुरस्कार जाहीर.
इमेज
सातारा जिल्ह्यात महामार्ग वगळता रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी, जिल्ह्यातील शाळा मात्र सुरु राहणार .
इमेज