खोडशी येथील अपघातात दोन जखमी.


कराड प्रतिनिधीः  खोडशी (ता. कराड) येथील श्रीराम मंगल कार्यालय जवळ सकाळी साडेसहा वाजता चारचाकी गाडीवरील क्रमांक (एमएच. 43, इए, 4452) चालकांचा ताबा सुटल्याने दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळावरून मिळालेली माहीती अशी, मुंबईवरून कराडकडे येणारी वॅगनार चारचाकी गाडीवरील चालकांचा तांबा सुटल्याने राष्ट्रीय महामार्गावर गाडीने तीन कोलांट्या खाल्या. या अपघतातबाजीराव विठ्ठल यादव (वय 52, रा बनपूरी, ता. पाटण), चंद्रकांत घारे (वय 42,रा घारेवाडी, ता. कराड) हे दोघे जखमी झाले आहेत. तर आश्‍विन नंदकुमार मोहिते (वय 32, रा. भुंईज,ता. वाई) हा स्वतःचालक या अपघातात सुरक्षिक्ष आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळावरून जखमींना हायवे हेल्पलाइन ईनचार्ज दस्तगीर आगा, अमित पवार, सलिम देसाई, योगेश पवार, विक्रम सावंत यांनी खाजगी रुग्णालयात दाखल केले. कराड शहर पोलिस स्टेशनचे कर्मचारी श्री. जाधव, श्री. इनामदार यांनी घटनास्थळांचा पंचनामा केला .