"हीच वेळ देवस्थानांनी आपली दानपेटी खुली करावी" : रोहित पवार


मुंबई : देशभरात करोना व्हायरसने हाहाकार माजवला असून दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. करोनाविरुद्ध लढण्यासाठी व्यावसायिक, खेळाडू, सिनेसृष्टीतील अनेक बड्या व्यक्तींनी कोट्यवधी रुपयांची मदत केली आहे. अशातच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी राज्यातील देवस्थानांही मदत करण्याचे आवाहन केले आहे.


रोहित पवार म्हणाले कि, कोरोनाविरुद्धच्या लढाईत मदतीसाठी पुढं आलेल्या लालबागचा राजा, सिद्धीविनायक, शिर्डी या देवस्थानांचे आभार. देणगी रुपात जमा झालेला दानपेटीतील पैसा समाजासाठी देण्याची हिच वेळ आहे. इतर देवस्थानांनीही आपली दानपेटी समाजासाठी खुली करावी, अशी माझी विनंती आहे व ते करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.