माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाणांनी साधला सरपंचांशी संवाद.

 कराड: देशभरात तसेच राज्यात कोरोंना ग्रस्तांची संख्या वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री तसेच कराड दक्षिणचे विद्यमान आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी मतदारसंघातील सरपंचांशी फोनवरून संवाद साधत गावातील सद्य परिस्थितीची माहिती घेतली. तसेच शासनाने ज्या समित्या सरपंचांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक गावात केल्या आहेत त्या समितीबाबतीत कश्या पद्धतीने कामकाज सुरू आहे याचीही माहिती घेतली. याचसोबत शासनाच्या ज्या योजना सदया सुरू आहेत त्याबद्दल सरपंचांना माहिती दिली, की गावात ज्या लोकांकडे दारिद्र्य रेषेखालील कार्ड आहे अश्या लोकांना 5 किलो राशन मोफत मिळणार आहे तसेच उज्वला योजनेमार्फत 3 महिन्यात 3 गॅसच्या टाक्या मोफत मिळणार आहेत अश्या काही शासकीय योजनांची माहिती आ. चव्हाण यांनी सरपंचांना दिली. गावातील लोकांना या योजनांचा फायदा व्हावा यासाठी प्रयत्न करावेत तसेच कोरोना बद्दल ग्रामस्थांमध्ये जागृती व्हावी या उद्देशाने ग्रामपंचायती कडून विविध उपक्रम राबविले जावेत अश्याही सूचना आ. चव्हाण यांनी सरपंचांना दिल्या व कोणतीही गावात अडचण आल्यास त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. 


आ. पृथ्वीराज चव्हाण सद्य परिस्थिति बद्दल राज्यातील सचिवांसोबत रोज बोलून राज्याचा आढावा घेत आहेत तसेच त्यांना उपयुक्त अश्या सूचना सुद्धा देत आहेत. याचसोबत आ. चव्हाण हे सातारा जिल्ह्यातील आढावा घेण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस प्रमुख तसेच आरोग्य अधिकारी यांच्याशी सुद्धा वेळोवेळी फोनवरून संवाद साधत चालू घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून आहेत. याच संवादाचा भाग म्हणून आज माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी मतदारसंघातील सर्व सरपंचांशी फोनवरून संवाद साधला, या सरपंचांच्या संवादाला सर्वच सरपंचांनी उत्साहाने प्रतिसाद देत बाबांशी बोलताना या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.


Popular posts
चक्क सुपारीवर साकारलं श्रीमहालक्ष्मीचं चित्र.
इमेज
मंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून जलजिवन मिशन योजनेअंतर्गत पाटण तालुक्यातील 101 नळ पाणी पुरवठा योजनांसाठी 29 कोटी 30 लक्ष रुपयांचा निधी मंजूर.
इमेज
कराड जनता बँकेच्या 8 संचालकांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला. न्यायालयाचा कराड बँकेच्या संचालकांना दणका
इमेज
काकासाहेब चव्हाण महाविद्यालयाचा झेप नियतकालिक अंक वेधक व प्रेरणादायक : संजय देसाई
इमेज
तळमावले बिट मध्ये, पोषण माह अभियान अंतर्गत सदृढ बालक बालिका स्पर्धा उत्साहात संपन्न.
इमेज