कोरोनाच्या लढाईसाठी रयत शिक्षण संस्थेची दोन कोटीची मदत.


मुंबई : संपूर्ण देशात लॉकडाऊन असल्याने गावातील गरीब व रोजंदारीवर काम करणाऱ्या कुटुंबाला दोन वेळेच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच गरजू लोकांसाठी अनेक मदतीचे हात देखील पुढे येत आहे .


तसेच सध्याच्या घडीला कोणताही देश मदतीसाठी पुढे येणार नाही. त्यामुळे आपणच एकत्र मिळून संकटाला मात करणं गरजेचे आहे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं होतं. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार अध्यक्ष असलेल्या रयत शिक्षण संस्थेने प्रतिसाद देत, कोरोनाच्या लढाईत आपलं योगदान दिलं आहे.


    ‘रयत शिक्षण संस्थेनेही पुढाकार घेतला आहे. कोरोनाच्या लढाईसाठी 2 कोटी रुपयांचा निधी देणारी रयत शिक्षण संस्था ही राज्यातील पहिली संस्था ठरलीय. रयत शिक्षण संस्थेकडून कोरोनाच्या लढाईसाठी राज्य सरकारच्या मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये २ कोटी रुपायांची मदत देण्यात आली आहे. संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊँटवरुन याबाबत माहिती दिली.