मुंबई : कोरोनाविरुद्ध लढ्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक अर्थात आरबीआयही मैदानात उतरली आहे. लॉकडाऊनच्या काळात रिझर्व्ह बँकेने व्याजदरात मोठी कपात केली. आरबीआयने रेपो दरात 0.75 टक्क्यांची कपात केली. त्यामुळे रेपो दर 5.15 वरुन 4.40 टक्क्यांवर आला आहे. तर रिव्हर्स रेपो दर 4.9 टक्क्यांवरुन 4 टक्क्यांवर आला आहे. आरबीआयच्या या निर्णयामुळे सर्व प्रकाराच्या कर्जावरील व्याजदर कमी होतील.
यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे रिझर्व्ह बँकेने अन्य बँकांना सल्ला दिला आहे की पुढील ३ महिने कोणत्याही कर्जावरील हप्ते अर्थात EMI ला स्थगिती द्या. आरबीआयने केवळ सल्ला दिला आहे. त्यामुळे हा सल्ला बँका ऐकणार का हे पाहावं लागेल.
लॉकडाऊनच्या काळात देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना अर्थात ‘बूस्ट’ देण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. त्यामुळेच रिझर्व्ह बँकेने अपेक्षेप्रमाणे रेपो दरात 75 बेसिस पॉईंटची कपात केली.