कोयना धरणात बोटींग सुरु करणेसंदर्भात प्रत्यक्ष पहाणी करुन अहवाल गृहमंत्रालयाकडे सादर करा. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचे जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षकांना आदेश.


दौलतनगर दि.०९ :- कोयना धरणात बोटींग सुरु करणेसंदर्भात मागील आठवडयात उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांचेकडे बैठक झाली होती या बैठकीमध्ये धरणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सविस्तर चर्चा करण्यात आली.या चर्चेमध्ये कोयना धरणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने निर्णय घेणेकरीता गृह विभागाचा  सविस्तर अहवाल प्राप्त होणे गरजेचे असून यासंदर्भात गृहविभागाची बैठक घेण्याचे ठरविण्यात आलेनुसार जिल्हाधिकारी,सातारा व सातारा पोलीस अधीक्षक या दोघांनी बोटींग सुरु करण्याच्या जागांची संयुक्त पहाणी करुन याचा तात्काळ अहवाल गृहमंत्रालयाकडे सादर करावा जेणेकरुन यासंदर्भात उपमुख्यमंत्री यांचेकडे अधिवेशन काळात बैठक घेवून निर्णय घेणे शक्य होईल असे आदेश गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह,पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते यांना दिले.
            उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांचेकडे झालेल्या बैठकीत गृह विभागाची बैठक घेण्याचे ठरल्यानुसार आज सातारा विश्रामगृह याठिकाणी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली या विषयासंदर्भात बैठक घेण्यात आली या बैठकीस सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह,पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते,कोयना धरण व्यवस्थापन अधीक्षक अभियंता एस.एल.डोईफोडे,कार्यकारी अभियंता कुमार पाटील,वन्यजीवचे विभागाचे प्रभारी उपसंचालक महादेव मोहिते,वन्यजीव कोयना विभागाचे सहाय्यक वनसरंक्षक सुरेश साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती.
        याप्रसंगी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी कोयना धरण व्यवस्थापन अधीक्षक अभियंता एस. एल.डोईफोडे यांचेकडून कोयना धरणाच्या जलाशयातील बोटींग करण्याच्या जलक्षेत्र उपलब्ध असणाऱ्या ठिकाणांची माहिती घेतली.यामध्ये धरणाच्या भिंतीपासून सुमारे ५ किमी अंतरावर बोटींग करणेकरीता मान्यता दयावी याकरीता मी स्वत: तत्कालीन गृहमंत्री केसरकर व तत्कालीन पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी हवाई तसेच प्रत्यक्ष जागांची पहाणी केली होती. तसेच यासंदर्भात तत्कालीन गृहराज्यमंत्री यांच्याकडे बैठकाही झाल्या होत्या.कोयना धरणामध्ये बोटींग सुरु व्हावे याकरीता मी स्वत: आग्रही आहे.परंतू धरणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बोटींग करण्याकरीताची जागा निश्चित करणे आवश्यक आहे. कोयना धरणामध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्या ठिकाणी बोटींग सुरु करण्याकरीता वाव आहे हे पहाण्याकरीता जिल्हाधिकारी, सातारा व सातारा पोलीस अधीक्षक या दोघांनी बोटींग सुरु करण्याच्या जागांची संयुक्त पहाणी करुन याचा तात्काळ अहवाल गृहमंत्रालयाकडे सादर करावा.अधिवेशनाचा कालावधी अजुन दोन आठवडयाचा आहे यापुर्वी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी या जागांची प्रत्यक्ष पहाणी करावी व अहवाल तयार करावा म्हणजे अधिवेशन काळातच उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांचेकडे उच्चस्तरीय बैठक घेवून या बोटींग सुरु करणेसंदर्भात निर्णय घेता येईल असे ना.शंभूराज देसाईंनी सुचित केले यावर जिल्हाधिकारी शेखर सिंह व पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते यांनी कोयना धरण व्यवस्थापनचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता व वन्यजीव विभागाचे संबधित वरीष्ठ अधिकारी एकत्रितपणे लवकरच त्या जांगाची प्रत्यक्ष पहाणी करुन लवकरच या विषयासंदर्भातील अहवाल सादर करतो असे सांगितले.


 


Popular posts
मंत्री शंभूराज देसाई यांची उद्या दौलतनगर येथे सभा. शक्ती प्रदर्शनाकडे जिल्ह्याचे लक्ष
इमेज
"आर.आर.(आबा) पाटील सुंदर गाव" पुरस्काराने मान्याचीवाडीचा गौरव ; मान्याचीवाडी ठरले जिल्हयातील स्मार्टग्राम.
इमेज
विनायक मेटे यांचा कार अपघातात अकाली मृत्यू! मराठा आरक्षण आंदोलनाचा आवाज हरपला
इमेज
कुंभारगाव ग्रामपंचायत मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा. सरपंच सौ. सारिका पाटणकर यांचे शुभहस्ते ध्वजारोहण संपन्न.
इमेज
कुंभारगाव येथे "हर घर तिरंगा "रॅली संपन्न.
इमेज