सातारा जिल्ह्यातील कृषी सिचाई योजनेतंर्गत धरणाच्या कामांना मिळणार गती:गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई .


कराड दि.०४:- सातारा जिल्हयातील प्रलंबीत विकासकामांना गती देण्याच्या दृष्टीने राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांनी विधानभवनात घेतलेल्या आढावा बैठकीत सातारा जिल्हयातील जलसिंचनाच्या कृषी सिचाई योजनेतंर्गत समाविष्ठ असणाऱ्या धरण प्रकल्पासह,इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्गांवरील रस्ते,ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या योजनांच्या कामांना व प्रलंबीत असणाऱ्या विकासकामांना कालबध्द गती देण्याचे आश्वासनमुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांनी दिले आहे.मुख्यमंत्री यांचेकडे झालेल्या बैठकीमुळे सातारा जिल्हयातीलपंतप्रधान कृषी सिचाई योजनेतंर्गत सहा धरण प्रकल्पांचा समावेश असून यामध्ये पाटण विधानसभा मतदारसंघातील वांग मराठवाडी,तारळी आणि मोरणा गुरेघर या तीन मध्यम धरण प्रकल्पांचा समावेश असून या प्रकल्पांच्या कामांना गती मिळणार असून तारळी धरण प्रकल्पातील धुमकवाडी,आवर्डे,कोंजवडे,बांबवडे व तारळे या पाच उपसा जलसिंचन योजनांची कामे मुदतीत पुर्ण करण्याच्या सुचनाही मुख्यमंत्री यांनी बैठकीत दिल्याअसल्याची माहिती गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी दिली आहे.


          मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांचे अध्यक्षतेखाली सातारा जिल्हयाच्या प्रलंबीत विकासकांमासंदर्भात विधानभवन, मुंबई येथे आढावा बैठक आयोजीत करण्यात आली होती.या बैठकीस जिल्हयाचे पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील,माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह सातारा जिल्हयातील सर्व आमदार, मुख्य सचिव अजोय मेहता व सर्व संबधित विभागांचे सचिव यांची उपस्थिती होती.


            मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांनी या बैठकीची सुरुवात करण्याची संधी ना. शंभूराज देसाई यांना दिल्यामुळे सातारा जिल्हयातील प्रलंबीत विविध विकासकामांचा आढावा बैठकीमध्ये देत असताना पाटण विधानसभा मतदारसंघातील प्रलंबीत असणाऱ्या काही बाबींकडे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांचे लक्ष वेधले यामध्ये कृष्णा खोरे विकास महामंडळातंर्गत सातारा जिल्हयातीलपंतप्रधान कृषी सिचाई योजनेतंर्गत सहा धरण प्रकल्पांचा समावेश असून पाटण मतदारसंघातील तीन मध्यम धरण प्रकल्पांचा यामध्ये समावेश आहे.यातील तारळी मध्यम धरण प्रकल्पातून नदीच्या दोन्ही तीरावरील शेतकऱ्यांच्या ५० मीटर उंचीच्या वरील डोंगरपायथ्यापर्यंतचे १०० टक्के जमिन क्षेत्रास धुमकवाडी, आवर्डे,कोंजवडे,बांबवडे व तारळे येथे उपसा जलसिंचन योजनांच्या माध्यमातूनपाणी देण्यास शासनाने सुधारित प्रशासकीय मान्यता देवून आवश्यक असणारा निधीही दिला आहे. या योजनांची कामे संथगतीने सुरु आहेत त्यास गती देण्याची गरज आहे तसेच मोरणा गुरेघर प्रकल्पाच्या उजव्या बाजूच्या कालव्यामुळे डोंगरपायथ्यापर्यंतचे क्षेत्र ओलिताखाली येत नसल्याने या क्षेत्राला उपसा जलसिंचन योजनेच्या माध्यमातून पाणी देण्याकरीता सदर प्रस्ताव शासनाचे तत्वत: मान्यतेकरीता सादर करण्यात आला असून ही बाब व्याप्ती बदलामध्ये समाविष्ट आहे.याससुधारित प्रशासकीय मान्यता देणे गरजेचे आहे.तसेच सातारा जिल्हयातील डोंगरी आणि दुर्गम भागातील जिल्हा परीषदेच्या अख्यारित इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्गांच्या कामांना आवश्यक असणारा निधी शासनाकडून मंजुर होवून या ग्रामीण रस्त्यांची कामे होणे आवश्यक असल्याचेही मुख्यमंत्री यांच्या निदर्शनास आणून दिले.


               यावेळी मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांनी संपुर्ण सातारा जिल्हयातील प्रलंबीत कामांचा आढावा घेतल्यानंतर पंतप्रधान कृषी सिचाई योजनेतंर्गत समाविष्ठ पाटण विधानसभा मतदारसंघातील वांग मराठवाडी,तारळी आणि मोरणा गुरेघर या तीन मध्यम धरण प्रकल्पांच्या कामांना गती देणेसंदर्भात शंभूराज देसाई हे आमदार असताना आग्रही होतेच आताही मंत्री झालेनंतर त्यांचा या कामांसाठी पाठपुरावा सुरुच आहे.पंतप्रधान कृषी सिचाई योजनेतंर्गत केंद्राचा हिस्सा धरणाच्या कामांना देण्यात येतो राज्याच्या वाटयाचा हिस्साही लवकरच या धरणांच्या कामांना देवून पंतप्रधान कृषी सिचाई योजनेतंर्गत समाविष्ठ असणाऱ्या कामांना कालबध्द गती देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न राहिल.तसेच मोरणा गुरेघर प्रकल्पाच्या उपसा जलसिंचन योजनेच्या माध्यमातून पाणी देण्याकरीताचा जो विषय आहे तो विभागाने मंत्रीमंडळापुढे आणावा त्यावर मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा करुन निर्णय घेतला जाईल.तर ग्रामीण भागातील जिल्हा परीषदेच्याअख्यारित इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्गांच्या कामांसदर्भात सातारा जिल्हयाचे पालकमंत्री व गृहराज्यमंत्री यांनी संयुक्त बैठक घेवून या ग्रामीण रस्त्यांचा प्रस्ताव शासनाकडे मान्यतेकरीता सादर करावा अशा सुचना मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांनी आढावा बैठकीत देवून सातारा जिल्हयातील प्रलंबीत विकासकामांच्या संदर्भात कालबध्दपणे गती देण्याकरीता राज्य शासनाकडून प्रयत्न केले जातील.असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. बैठकीमध्ये सातारा जिल्हयाच्या सर्वांगीण विकासकामांवर मुख्यमंत्री यांचेकडे सकारात्मक व सविस्तर चर्चा झाल्याने सातारा जिल्हयातील सर्व लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्री ना.ठाकरे यांचे जाहीर आभार व्यक्त केले.