श्री संतकृपा कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये आज दीक्षांत समारंभाचे आयोजन.
कराड दि.०५ : घोगाव तालुका कराड येथील श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे श्री कॉलेज ऑफ फार्मसी या औषधनिर्माण-शास्त्र महाविद्यालयाचा दीक्षांत समारंभ आज गुरुवार दिनांक ५/०३/२०२० रोजी सकाळी १०:३० वाजता संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मळाई देवी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व शेतीमित्र श्री अशोकराव थोरात यांच्या शुभ हस्ते पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे शिवाजी विद्यापीठाच्या सूचनेनुसार दरवर्षी महाविद्यालयातच या पदवीप्रदान समारंभ आयोजन करण्यात येते.
या खास समारंभासाठी शिवाजी विद्यापीठ शैक्षणिक परिषदेचे सदस्य व भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी कोल्हापूरचे प्राचार्य डॉ. एच . एन .मोरे .
संस्थेच्या उपाध्यक्ष डॉ. उषा जोहरी ,सचिव प्रसून जोहरी व संस्थेच्या विविध महाविद्यालयाचे सर्व प्राचार्य आदी मान्यवर या समारंभासाठी उपस्थित राहणार आहेत.
अशी माहिती कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. विजयानंद अरलेलीमट व परीक्षा विभाग प्रमुख भाग्येश जानुगडे यांनी दिली.या समारंभाचे नियोजन समारंभ समितीने केले आहे. या समारंभासाठी संस्थेचे अध्यक्ष शशिकांत पाटील व संचालक सागर पाटील यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.