लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब यांच्या ११० व्या जयंती निमित्त आयोजित समारंभात ना.शंभूराज देसाई यांची प्रमुख उपस्थिती.


पाटण दि.०८ महाराष्ट्राचे पोलादी पुरुष,राज्याचे माजी गृहमंत्री व पाटण तालुक्याचे दैवत लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचा ११० वा जयंती सोहळा कार्यक्रम मंगळवार दि.१० मार्च, २०२० रोजी सकाळी १०.०० वा.दौलतनगर (मरळी), ता.पाटण या ठिकाणी संपन्न होणार असून हा कार्यक्रम “महाराष्ट्र दौलत” लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक याठिकाणी आयोजीत करण्यात आला आहे. या कार्यक्रमास राज्याचे नवनिर्वाचीत गृह, वित्त व नियोजन राज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
        प्रसिध्दीपत्रकात त्यांनी पुढे म्हटले आहे की, महाराष्ट्राचे पोलादी पुरुष,राज्याचे माजी गृहमंत्री व पाटण तालुक्याचे दैवत लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब यांचा जयंती सोहळा प्रतिवर्षी पाटण तालुक्यात विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येतो.प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी मंगळवार दि.१० मार्च, २०२० रोजी स्व.लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचा ११० वा जयंती सोहळा कार्यक्रम दौलतनगर ता.पाटण येथे “महाराष्ट्र दौलत” लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक याठिकाणी आयोजीत करण्यात आला असून हा कार्यक्रम अतिशय दिमाखदार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास राज्याचे नवनिर्वाचीत गृह, वित्त व नियोजन राज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून त्यांचेसोबत मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, युवा नेते यशराज देसाई हेही उपस्थित राहणार आहेत.