मुंबई : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने आता कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर आज मध्यरात्रीपासून अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नाईलाजास्तव मला हा निर्णय घ्यावा लागत असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. राज्यात हा कोरोना विषाणू जास्त पसरू नये म्हणून जिल्ह्याजिल्ह्यातील सीमाही बंद करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितले. यावेळी रविवारी जनता कर्फ्यूला लोकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल मुख्यमंत्र्यांनी नागरिकांचे आभार मानले. राज्यातील नागरिकांना संबोधित करताना जनता कर्फ्यूला दिलेल्या प्रतिसादाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांचे आभार मानले. मात्र, टाळ्या किंवा थाळीनाद केल्याने कोरोना जातो हा गैरसमज डोक्यातून काढून टाका. अत्यावश्यक सेवांमध्ये अहोरात्र झटणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आपण हे केल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात आज सायंकाळपासून संचारबंदी - उद्धव ठाकरे .