कोल्हापुरात दोन नवे रुग्ण महाराष्ट्राची संख्या 131 वर.

 



कोल्हापूर प्रतिनिधी :  राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा १३१ वर पोहोचला आहे. काल एका दिवसात तब्बल २१ नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाचा धोका वाढला आहे. कोल्हापूर येथे कोरोनाचे २ रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे.


सांगलीनंतर आता कोल्हापूरातही कोरोना पोहोचला आहे. जिल्ह्यात कोरोनाचे २ रुग्ण सापडल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. कोरोना विषाणू आता मुंबई, पुणे सोडून ग्रामिण भागांतही फोफावू लागला आहे. आता पुढच्या काही तासांत काय होतंय हे पाहणं औत्सुक्याचं ठरणारंय.


दरम्यान, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी नागरिकांना घाबरुन न जाण्याचे आवाहन केले आहे. सदर कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरु असून त्यांच्या संपर्कांत कोण कोण आले होते याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे .